Monday, August 16, 2010

नरक

वपुंचे एक वाक्य आहे , हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक ! हे पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीमध्ये वाक्य आहे आणि हवा तेव्हा हवा तो माणूस नसणे म्हणजे नरक हे पुस्तकाच्या शेवटी... ! असाच विचार करताना वाटले असे का असावे.. म्हणजे त्या दोन गोष्टींच्या जागा बरोबर आहेत कथेमध्ये पण जर विचार करायला गेलो तर माणसाचा समजुतदारपण वाढला असण्याचे पण एक लक्षण आहे म्हणजे ज्यावेळी अगदीच कॉलेज मध्ये जायला लागलेलो असतो त्यावेळी एकदम मोठे झालो आहोत आपण , आता आपले आयुष्य माझे आहे.. मी काहीपण करू शकतो त्याचे.. हि भावना आलेली असते .. आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टी पण प्राव्हेट ठेवायला लागतो उगीचच. सारखे वाटत असते कि आई माझे मित्र आल्यावर माझ्या रूम मध्ये काय करत आहे.. त्यावेळी हेच वाटत असते कि कोणी नको आहे.. आपण आपल्या मस्ती मध्ये असतो .. काही वर्षे जातात हे समजायला कि माणसांशिवाय आपण नाही जगू शकत... आणि ती माणसे जोडायला बऱ्याच गोष्टी करायला लागतात.. खूप साऱ्या तडजोडी कराव्या लागतात. आणि हवा तेव्हा नको असलेला माणूस काढणे सोपे होऊन जाते आयुष्यात पण हवा तेव्हा हवा तो माणूस असणे आपल्याबरोबर इतके सोपे राहत नाही .. आयुष्य जसे जसे पुढे जायला लागते तेव्हा लक्षात येते कि अगदी शाळेपासून ज्याच्याबरोबर आहे त्या मित्राला आता सोडून जावे लागेल पुढचे शिक्षण घेण्यासाठी मग तिथे २-३ चांगले मित्र बनतात वाटत असते कि आता हे राहतील आयुष्यभर आपल्या बरोबर पण नाही परत वेळ येते सगळे सोडून देवून करियर च्या मागे लागायची .. मग बाकीच्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात.. आणि मग लक्षात येते कि मागे जे काही आपण सोडून आलो आहोत ते त्यावेळी कधी कधी नकोसे पण वाटायचे पण आता ते त्यावेळी नकोसे वाटलेले क्षण पण चालतील पण तो काळ परत यावा.. राहावे त्याच माणसांबरोबर कायमचे असे विचार यायला लागतात .. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ... आणि मग तो हवा असलेला तिसरा माणूस अजूनच खूप दूर गेलेला असतो.. कदाचित त्याला पण तेच वाटत असत असेलही पण म्हणून जे जगणं आपण स्वीकारले आहे त्यातून मागे फिरणे इतके सोपे कुठे राहिलेले असते.. मग राहते काय फक्त , काही जुन्या अर्धवट आठवणी , काही कायमचे लक्षात राहिलेले निरोप , काही कधीच व्यक्त न केलेल्या भावना , काही कधीच विसरता न येणारे चेहरे.. काही विसरलेले वाढदिवस , काही केलेले आणि पूर्ण न झालेले खूप सारे प्लान्स ... आणि असेच बरेच काही ..!

3 comments:

  1. Wow you have put my feelings into words..love what you have written..keep writing..:)

    ReplyDelete
  2. मस्तच व्यक्त केलं आहेस.
    पण तरी सुद्धा....'moving on...is the name of the game!' असा म्हणा वस वाटतं आहे :)

    ReplyDelete