घरात असेच एकटे बसले कि जाणवते कि आपल्या आजूबाजूला किती आवाज होत असतात सारखे .. आणि आपण त्यातले अर्धे आवाजांकडे लक्ष पण नाही देत.. पण ज्यावेळी घरी कोणी नसते आणि निरव शांतात पसरलेली असते .. त्यावेळी अचानक ते सगळे आवाज जाणवायला लागतात.. आणि मग एकदम वाटते कि आधी हे सगळे कधी का जाणवले न्हवते.. मग मी असाच विचार करत होते.. सकाळी उठल्यावर शेजार्याच्या घरी चालणारा रेडीओ, कुत्र्याचा भुंकणे , लहान बहिणीशी बडबड , बाबांचे फोन वर बोलणे आणि मग आईची स्वयपाकघरात चाललेली गडबड तिला पण एक विशिष्ट्य असा आवाज असतो .. आज अशीच मी एकटी घरी बसलेली .. काही करायला नाही आणि अचानक मी कधीही न ऐकणारे हे सगळे आवाज आज आठवत आहे .. आणि विचार करत आहे कि हे सगळे आवाज असताना मी कधी लक्ष नाही देत पण नसताना असे हे त्रास का देतात आठवून .. काही काळात न्हवते.. मग मला लक्षात आले कि ते आवाज नसतात जे आपण आठवत असतो .. तर ते आवाज करणाऱ्या माणसांना आपण स्मरत असतो.. त्यांचे आपल्याबरोबर असणे त्यांनी आपल्या आजूबाजूला असणे या सगळ्या गोष्टी आपण आठवत असतो .. कारण यातला प्रत्येक आवाज काढणारा एक माणूस आहे .. ज्याच्याशी आपण जुळलेलो असतो .. आणि मग ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतात ..मग एक वेळ अशी येते ज्यावेळी आपण फक्त त्या आवाजाबरोबर बर्याच गोष्टी डोक्यात यायला लागतात..
तसेच काहीसे मनसे असताना पण होत असेल का ? म्हणजे आपण माणसात आहोत पण एखादा माणूस असे काही वागतो कि आपल्याला त्याच्या मुले कुणाची तरी आठवण येते.. आणि मग जवळ असलेला माणूस आपण विसरून जातो काही क्षणासाठी का होईना..मग त्या जगातून या जगात परत येताना आपण तो आवाज मनात ठेवतो.. असाच तो आवाज माणसाची ओळख असते आपल्या मनात कोरलेली.. आपण ते कधीच ठरून करत नाही .. ते आपोआप होऊन जाते.. काही काही रहस्य उलगडता येत नाहीत हेच खर.. तसेच एखाद्या माणसाचे अस्तित्व आपल्याबरोबर असणे म्हणजे खरच कधी कधी न उलगडणारे सत्य आहे तर कधी कधी विचार करायची गोष्ट च नाही आहे .. ती अनुभवायची गोष्ट आहे .. मनापासून जगायची गोष्ट आहे .. आणि अशी माणसे आयुष्यात आहेत यासाठी खुश होण्याची गोष्ट आहे..
No comments:
Post a Comment