Wednesday, August 4, 2010
चहाचा भुरका
जागेचे महत्व इतके का असते ...? म्हणजे प्रत्येकासाठी प्रत्येक जागेविशायीच्या भावना वेगळ्या असतात... आणि हे फक्त जागेविषयी आहे असे नाही.. गाणे असते , सिनेमा असतो , एखादा टी- शर्ट, एखादे वाक्य असते ... तर त्या घटनांशी काहीतरी आयुष्यातला भाग गुंतलेला , गुफान्लेला असतो.. आणि तो काही केला आपण नाही विसरू शकत... असे काहीसे असते.. त्यामुळे त्या गोष्टी पण महत्वाच्या झालेल्या असतात.. तसे बघायला गेले तर या सगळ्या निर्जीव आणि काही करू न शकणार्या गोष्टी आहेत .. पण त्या अशा काही आठवणी बरोबर जोडल्या गेल्यामुळे.. त्या पण आपल्या बरोबर बोलायला लागतात .. आणि मग निर्जीव वाटणार्या गोष्टी पण बोलायला लागतात आपल्या बरोबर.. जे सांगणे खरच कठीण आहे कि नक्की काय असते.. पण प्रत्येकाच्या अश्या काही गोष्टी असतात.. चांगल्या काही वाईट.. काही चटका लावून जाणार्या.. अश्या सगळ्या प्रकारच्या.. पण जसा जसा वेळ निघून जायला लागतो .. त्या गोष्टी मागे पडायला लागतात आणि त्यांची जागा दुसर्या वस्तू , गोष्टी घ्यायला लागतात.. आपल्याही नकळतपणे ...आणि मग कधीतरीच असे एकदम आठवून जाते कि अरे काय दिवस होते ते.. प्रत्येकाला पुढे पाळायचे असते .. मग आपण आता या क्षणाचा कधी विचार करतो.. प्रत्येक क्षणाला आपण कसला न कसला पुढचा विचार करत असतो.. आणि मग असे करतानाच आहे तो क्षण पण निघून जातो.. पण जाता जाता ..नकळत काही क्षण अविस्मरणीय बनतात.. आणि मग सारखे वाटते कि अरे यार आपण असे कधी आपण जगू का ? मग तो आपला एक उच्चांक बनतो .. म्हणजे कुठल्या पण गोष्टी झाल्या कि आपण त्या गोष्टीची तुलना करतो.. थोडक्यात आपण भूत , वर्तमान आणि भविष्य एकत्र आणायचं प्रयत्न करत असतो सतत.. आणि कुठेतरी माहित पण असते कि असे होणे किती अवघड आहे पण तो नेमका क्षण परत पकडायचा प्रयत्न आपण सतत करत असतो.. किंवा तसाच माणसाचा स्वभाव असेल.. प्रत्येक क्षणाला स्वतःची अशी काही ओळख आहे.. पण आपण भेटलेल्या सगळ्याच माणसांना कुठे लक्षात ठेवतो ना काही अशीच आपल्या आयुष्यावर ठसा उमटवणारी माणसे आपल्या लक्षात राहतात... बाकीची अशीच जातात कुठेतरी विस्मृतीत .. तसेच काहीसे .. क्षणांचे पण होत असावे .. एखादा क्षण ठसा उमटवून जातो.. आणि मग त्याच्या जोडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहतात.. आणि एका बेसावध क्षणी जशी ती माणसे निघून जातात आयुष्यात तसेच ते क्षण पण मागे पडतात.. अर्थात विसरता कधीच नाही येत पण हा पण ते रोजच्या जीवनाचा भाग व्हायचे कमी कमी होत जाते आणि एका दिवशी आपण वेगळ्या चिंता करायला लागलेले असतो.. आणि मग आयुष्यातच्या उतरतीला.. आपल्या नवऱ्याबरोबर चहाचा भुरका घेताना एका निवांत क्षणी येऊन एकदम त्या सगळ्या आठवणी युद्ध करायला लागतात.. हिशोब मांडायला लागतात.. आयुष्यात्च्या शेवटाला... चूक बरोबर याच्यापेक्षा काय करायचे राहून केले हेच जास्त सांगायला लागतात.. आणि मग डोळ्यात एक टपोरा थेंब येऊन आपलेच प्रतिबिंब दाखवतो.. मग लक्षात येते कि भविष्यासाठी असे आपण किती क्षणांना विसरलो आहोत.. , काही काही तर जगायचेच विसरून गेलो .. वातावरणात कशी शांतता पसरते.. तश्यातच चहाचा कपाचा चटका लागतो आणि मग आपण भानावर येतो... !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment