Wednesday, August 4, 2010

दृश्य - अदृश्य

ताल सिनेमा बघत होते .. बर्याच दिवसांनी .. तसा मला तो अक्षय खन्नाचे पात्र खूप आवडते .. वास्तवात असे कोणी असणे जरा अवघड आहे.. पण त्यांना छान वाटवले आहे ...अभिनय पण छान केला आहे .. पण तो मुद्दा नाहीच आहे.. असाच विचार करत होते .. ताल मधल्या एका गाण्यात शहीद कपूर आहे .. म्हणजे काही सेकंद साठीच आहे .. पण आहे.. अर्थात हे कळले कधी ज्यावेळी शहीद कपूर मोठा नट बनला.. म्हणजे काय काही काळासाठी तो अदृश्य होता आणि एका वेळेला अचानक दृश्य झाला .. जर तो नुसता असाच डान्सर राहिला असता तर कोणी त्याकडे लक्ष पण दिले नसते .. आपल्या आयुष्यात पण असे होत असेल ना.. म्हणजे कधी कधी अदृश्य असणारी .. बरीच माणसे किवा नाती .. जी कधी काळी अदृश्य होती किंवा आता अदृश्य आहेत.. आणि नंतर दृश्य झाली .. आता माझी रूममेट आहे ती आणि मी ३१ डिंसेबर २००७ ला एकाच वेळी एका ठिकाणी होतो .. पुण्याच्या जे एम रोड वर .. पण त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत पण न्हवतो .. एकमेकांना पास झालो असलो तर ते पण नाही माहित.. आणि नंतर भेटलो हजारो मैल दूर आणि जिवाभावाच्या मैत्रिणी झालो .. पण आता विचार केल्याशिवाय राहवत नाही कि त्यावेळी भेटलो असतो तर काय वेगळे झाले असते.. कदाचित आम्ही कधीच इकडे येऊन चांगल्या मैत्रिणी झालो नसतो किंवा अजून चांगल्या मैत्रिणी झालो असतो.. ! अर्थात तो प्रश्न कायम अनुउत्तरीत राहिल, नाही का ?
मग अर्थात अजून एक विचार आला कि उलटी प्रोसेस होते का ? तर नाही कधीच नाही होत ... कारण एकदा दृश्य झालेली व्यक्ती कधीच परत अदृश्य करता येत नाहीत .. ती व्यक्ती /नाते संपले किंवा निघून गेलीतरी ते नाते कधीच अदृश्य नाही होत.. आठवणी असतात .. आयुष्यातला कुठला ना कुठला भाग त्या माणसाची जोडला गेलेला असतो .. आणि त्यातले काही भाग आनंद देणारे असतात काही चांगल्या वेळाची आठवण करून देणारे असतात.. तर काही असेच डोळ्यात पाणी आणणारे .. पण म्हणून कोणी थांबत नाही ना.. सगळीजण नेहमीच अशीच रोज अदृश्य माणसांना दृश्य करायचा प्रयत्न करत असतात.. तोच तर माणसाचा स्वभाव आहे .. आणि कितीही चांगले वाईट अनुभव आले तरी माणूस काही थांबणार नाही आहे .. हे कायम असेच चालू राहील .. अविरतपणे.. !

1 comment: