Wednesday, August 4, 2010
बार्टर
शांतता का हवी असते माणसाला .. चिंतन मनन करायला कि माणसापासून थोडा वेळ दूर जाऊन परिस्थितीचा विचार करायला .. खरच माणसाला शांतता का हवी असते ? असा विचार करताना जाणवले कि या प्रश्नाचे उत्तर शोधायला पण शांतता हवी आहे मला.. मजेदार आहे ना किती गोष्ट .. म्हणजे माणसाचा स्वभाव वेगवेगळा , त्याच्या मागण्या वेगळ्या , त्याची आजूबाजूची परिथिती वेगळी, पण काही काही गोष्टी जगातल्या प्रत्येक माणसामध्ये कश्या काय सारख्या असू शकतात ना ? असा विम्झीकल विचार करायला लागले कि काहीच सरळ अन साधे सोपे वाटत नाही.. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी विचित्र अर्थ निघतो आणि प्रत्येक वेळी तो पटेल ,आवडेल किंवा समजेल असे पण नाही..तर शांतता हि गोष्ट म्हणजेच विचित्र आणि मिळायला खूप अवघड.. म्हणजे मारामारी ,महायुद्ध होते इतके महाकठीण आहे .. तरी माणूस प्रत्येक ठिकाणी ती शोधायचा प्रयत्न करतो.. त्याला अजून उमजले नसेल का कि ती तशी फार अवघड गोष्ट नाही आहे मिळवायला फक्त स्वतःहून मागायची गोष्ट आहे... म्हणजे शांतता हवी असेल तर ती शोधायची गरज नसते ती कायमच आपल्याबरोबर असते .. फक्त तिला मिळवताना आपण काही जवळचे गमवणार नाही ना .. याची काळजी प्रत्येक वेळेला घ्यावी लागते.. आणि माझे असेच होते.. नेहमी मी असे काहीतरी प्रयत्नपूर्वक ठरवते जे होऊ नाही द्यायचे पण कधीच नाही यश येत त्यामध्ये.. अगदी माझे असेच होते .. शांतता मिळवताना पण त्याच्या शोधात मी कुठे तर स्वतःच हरवून जाते असे सारखे वाटते आणि मग मला परत येता येत नाही.. रस्ताच सापडत नाही.. मी कुठेतरी दूर जाऊन पोचलेले असते.. अनोळखी प्रदेशात.. माणसे नवीन , जागा नवीन.. जुनी काय असेल तर ती फक्त मी न माझा भूतकाळ .. मग परत सुरु होते माझी लढाई .. आणि माझा अट्टाहास शांतता मिळवण्यासाठीचा ... पण त्यातून कधीच काही मिळत नाही मला.. नेहमी मला असे वाटते राहते कि मी शांततेसाठी बार्टर करत आहे... माझ्या माणसांबरोबर.. आणि शेवटी फारच तोटा करून घेते मी माझा .. आणि ती शांतता या विचारात कुठेतरी हरवून जाते.. आणि मग परत माझा जुनाच ठरलेला नवीन प्रवास सुरु होतो.. परत कुणाशीतरी बार्टर करायचे कुणाला तरी देऊन त्या शांततेसाठी.... !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment