रात्रीचे ३ वाजलेले असतात .. कितीदा हि कुशी बदलून पहिले तरी काही झोप येत नसते... डोक्यात खूप काही विचार चालू असतात.. बरेचसे चांगले नसतात.. डोक्यातले विचार घालवण्यासाठी तुम्ही उठून पाणी पिता, मोबाईल चेक करता उगीचच इतक्या रात्री कोण फोन किंवा मेसेज करणार आहे ... ?? त्यानंतर तुम्ही परत काही वेळ झोपायचा प्रयत्न करता ... काही उपयोग होत नाही .. आणि मग अचानक आई ला फोन लावतो.. तिचा दिवस असतो ... त्यामुळे ती काही बाही कामे करत असते.. फोन केल्यावर हेल्लो म्हणायच्या ऐवजी ती विचारते झोपली नाहीस का अजून ? किती वाजले ?? मी म्हणते काही नाही ग.. असाच झोप येत नव्हती.. मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायला लागते.. पण आपण त्यातले काही ऐकत पण नसतो.. नुसतेच हो हो म्हणत असतो.. अन मग कंटाळून आईला म्हणतो कि ठीक आहे चल मी ठेवते फोन .. झोपते.. नेमके फोन ठेवता ठेवता आई म्हणते कि काळजी करू नकोस होईल सगळे व्यवस्थित, नको इतकी काळजी करूस... ! अन मग फोन समाधानाने ठेवत आपण झोपून जातो.. एकही कुशी न बदलता.. कसे जमते आई ला ते ?? कसे कळते तिला कि exact कुठले शब्द ऐकायचे आहेत आपल्याला.. !
संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्या आल्या .. येऊन टेबल वर बसलेली मी.. चहा प्यायची इच्छा आहे पण बनवायची नाही आहे .. म्हणून तशीच मी बसलेली.. तेवढ्यात रुममेट येते.. आणि म्हणते चल मी मस्त चहा करते प्यायचा आहे का तुला.. ? मी आपल्याच विचारात मग्न काही बोलतच नाही... १० मिनिटाने ती चहाचा कप ठेवते अन जाते निघून तिच्या रूम मध्ये.. थोड्या वेळाने ती परत येते मी आपली तिथेच बसलेली .. ती येते अन म्हणते चल बाहेर जाऊयात कुठेतरी .. मी काही न बोलता बाहेर पडते तिच्याबरोबर.. पूर्ण वेळ आम्ही काहीही बोलत नाही .. घरी आल्यावर एकमेंकींना गुड नाईट करतो अन जायला लागतो आपआपल्या रूम मध्ये.. जाताना हक मारून रुममेट म्हणते.. "dont worry you'll be fine.. " अन अचानक जग परत नॉरमल वाटायला लागते.. कधी अनोळखी असणारी रुममेट जिवाभावाची मैत्रीण होऊन जाते.. अनोळखी देशात ती कधी आपली family होऊन जाते.. तिला कसे कळते कधी शांत बसले पाहिजे आणि मी काय विचार करत आहे हे न सांगता तिला कसे कळते... !
साधारण ७-८ महिने झालेले असतात तुम्हाला बोलून.. पण कधी काळी ज्यावेळी फक्त कॉलेज आणि परीक्षा याच नको असलेल्या गोष्टी होत्या .. अश्या काळातला तुमचा खूप चांगला मित्र.. पण नंतर करिअर च्या मागे लागल्यावर कुठेतरी मागे पडलेला मित्र.. असाच कुठल्यातरी निवांत रविवारी आठवण येते त्या सगळ्या जुन्या दिवसांची आणि मग आपण फोन हातात घेतो .. फोन लागतो.. हेल्लो म्हटल्या म्हटल्या तो तुमचा आवाज ओळखतो .. आणि इतका खुश होतो कि वाटतात कि ते सोनेरी दिवस परत आले आहेत.. त्याच्याशी बोलायला काही उरलेले तर नसते.. पण इतके दिवस कुठे होतास विचारण्याऐवजी तो जिथे सोडले होते तिथून उचलल्यासारखे बोलायला लागतो.. अन सगळे अंतर गळून पडते .. तुम्ही तसेच जुने मित्र बनून जाता परत एकदा.. कॉलेज च्या कट्ट्यावर दंग करणारे.. तिथे का हेवेदावे, अहंकार मधे येत नाही.. कडू आठवणी ऐवजी आपण चांगल्या आणि मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या आठवणी का बोलायला लागतो .. अचानक.. सगळे समज गैरसमज कसे काय गळून पडतात ?? वर्तमान बद्दल काही माहिती नसले तरी भूतकाळ कसे काय इतके जोडून ठेवतो .. !
गाडी पंक्चर झालेली असते म्हणून तुम्ही एखाद्या दिवशी ट्रेनने जात असता .. अचानक ऑफिस मधला नेहमी कॉर्रीडोर मध्ये किंवा एलीवेटर किंवा लंच रूम मध्ये दिसणारा माणूस दिसतो.. तुम्ही त्याला हजारदा पाहिलेले असते पण कधी बोललेलो नसतो फक्त कधीतरी हसून निघून गेलेला असता.. अचानक त्याला बघून तुम्ही हसता.. अन मग तो बोलायला सुरु करतो काही बाही .. नावांची देवाण घेवाण होते.. ऑफिस मध्ये पोचेपर्यंत तुम्ही बोलत राहता .. आणि तुमचा स्टेशन येते .. उतरता उतरता तुम्ही म्हणता त्याला कि चल भेटू परत अन तो तुम्हाला सांगतो नाही आज माझा शेवटचा दिवस आहे .. आणि अचानक तुम्हाला त्याचे वाईट वाटते.. ज्याचे इतके दिवस नाव पण माहित नव्हते आणि तुम्ही कधी बोलला पण नव्हता .. तर त्याच्या जाण्याचे दुःख का असावे मला ? असे नुसते रोज हसून आणि काही न बोलता नाती कशी जोडली जातात .. आणि त्या माणसाला जाणून घ्यायची इच्छा का निर्माण होत राहते ?? येता जाता दिसणारा तो अनोळखी माणूस कधी तुमच्या आयुष्याचा भाग होतो ते तुम्हाला कळत पण नाही . आणि तुम्ही स्वतःवरच चिडता कि का इतके दिवस आपण कधी बोललो नाही त्याच्याशी .. पण असले प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतात नाही का .. !
माणसाला रुटीनचे व्यसन असते .. एखादी गोष्ट नीट झाली नाही तर पुरा दिवस काहीतरी चुकल्यासारखे असे वाटण्यात जातो .. मग आई- बाबांबरोबर राहताना कधी न जाणवलेले आई चे अस्तित्व अचानक रुटीन मध्ये कुठे येते, कॉलेज मध्ये असताना रुटीनचा भाग असलेला जिवाभावाचा मित्र कधी रुटीनच्या बाहेर पडून भूतकाळ होतो, रुममेट म्हणत असताना रुटीन मध्ये कधी family होते कळत नाही ... तसेच काहीसे रुटीन जरा बदलेले कि नकळत घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी अचानक समजायला जाणवायला लागतात .. पण आपण फक्त परत त्या रुटीनलाच धरून चालायला लागतो .. नाही का ???
Thursday, January 20, 2011
Saturday, January 15, 2011
रूममेट !
सकाळचे साडेसात.
तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस.
ओठाच्या कोपर्यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच.
गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय.
गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा.
तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर !
तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा.
आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा !
तू शब्दश: नि:संग आहेस.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा.
तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही.
तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस.
याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा.
एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस.
याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही !
बस्स.
तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे.
त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही.
मी विचारायला हवे होते का??
असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही.
"रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव.
आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच.
आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची.
मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू.
आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो.
माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो.
तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे.
मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस.
माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस.
हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस !
तुझी आठवण नक्कीच येईल.
हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण.
काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते.
आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस !
आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास.
तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू !
आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का?
मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्याला सांग तसे.
परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला.
मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही !
तुझाच-
रूममेट.

Wednesday, January 12, 2011
स्वप्न आणि आयुष्य
खूप काही व्हायला खूप काही दिवस जायला लागतात असे काही नाही आहे ना ? म्हणजे काही काही वेळेला एकाच क्षणामध्ये मध्ये किती गोष्टी होऊन जातात .. ज्याचा आपल्याला पत्ता पण लागत नाही .. आणि जेव्हा त्या गोष्टी घडल्यामुळे झालेला परिणाम दिसायला लागतो आयुष्यामध्ये तसा खूप उशीर झालेला असतो.. म्हणजे तुम्ही मागे वळून बघू शकता पण फारसे काही बदल करू नाही शकत.. मुळात जे काही झाले ते तुमच्या चुकीमुळे झाले असे नसेल.. पण त्यावेळी एखादी बरोबर गोष्ट अचानक चुकीची वाटायला लागते.. माहित नाही का पण काय विचार केला होता आपण असा विचार करायला लागतो आपण .. आणि माहित नाही ते बरोबर आहे का चूक आहे कारण प्रत्येक विचाराच्या मागे त्यावेळची परिस्तिथी खूप प्रमाणात अवलंबून असते.. आणि चुका लक्षात आल्यावर मागे वळून बघण्यापेक्षा पुढे जाताना करायचे बदल विचारात घेतले पाहिजेत ना खरतर .. पण असे घडत नाही .. आपण त्यात अजूनच गुरफुटत जातो .. आणि अचानक एका संध्याकाळी लक्षात येते आयुष्य निघून गेले.. इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या करायच्या .. काहीही पूर्ण करू नाही शकलो.. पण दुसर्याच्या चष्म्यातून बघताना गोष्टी खूप वेगळ्या दिसत असतात.. कदाचित.. वरवर आपण सुखी दिसणारी माणसे किती मनाने खचलो आहोत .. किती ओझ्यामध्ये राहत आहोत .. कशाचे भान नसते ना राहिलेले आपल्याला.. अन काय मिळवायचा आटापिटा करत असतो आपण आपल्याला तरी उमगलेले असते का ते कुणास ठाऊक.. आता माझ्या आयुष्यातला कितीतरी अश्या गोष्टी आहेत ज्या मी का केल्या याची उत्तरे मागे वळून बघताना कधीही मला मिळत नाहीत अन लहान होतो वेडे होतो म्हणून काही गोष्टी सोडून देता येतात पण अखं आयुष्य आपण असे नाही जाऊ देऊ शकत.. अन असा विचार करता करता परत बरेच वर्षे उलटून जातात.. म्हणजे आपण जगायला कधी लागतो असे म्हणायचे..
म्हणजे नेहमीच सगळ्यांना असे वाटत असते कि आपण जसे जसे मोठे होवू तसे चांगले जीवन कसे जगावे कळत जाईल तर याच्या बरोबर उलटे होत जाते का ??? अजून काय होते.. म्हणजे तसे बघायला गेले तर मोठे झाल्यावर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.. पण जशी जशी मागच्या प्रश्न्याची उत्तरे मिळत जातात तसे तसे प्रश्न पण वाढतच जातात कि .. त्यांचा मेळ लावायचा असे ठरवले तर जीवन जगणे म्हणजे फक्त आपण अस्तित्वात असण्यासारखे आहे.. बाकी काही जगणे राहतच नाही ना मग ??? आणि खरच जीवनात आयुष्य शोधायचे असेल तर प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत का ? आहेत ते आयुष्य प्रश्नांना सोडून जगले पाहिजे.. आणि खरच असे जगता येते का? प्रश्न समस्या यांना जर आयुष्यात स्थान दिलेच नाही तर जीवनामध्ये आयुष्य राहील का ? म्हणजे जर प्रश्न, प्रोब्लेम सगळे हातात हात घालून चालत असतील तर त्यातच आपण आयुष्य का नाही शोधात.. पण इतके लांब का पाळतो त्यापासून.. आणि त्यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला नेहमीच हव्या असतात पण मिळाल्या कि त्या का आपल्या नाही राहत? म्हणजे ते काहीतरी दुसर्याचे स्वप्न पूर्ण केल्या सारखे का वाटत राहते.. आणि माझे मलाच प्रश्न पडायला लागतात कि हेच स्वप्न मी पहिले होते का ? आणि पहिले असले तर ते आता पूर्ण झाले आहे मग आता काय करायचे ? नेहमी माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत न .. तसे असेल तर मग मला माझ्या पुढच्या आयुष्यातली स्वप्न का नाही हात धुवून मागे लागून पूर्ण करायची आहेत.. असे का आहे ?
काही काही गोष्टी कळणे म्हणजे खूप अवघड असते तसेच काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा अट्टाहासच असायची गरज नाहीय पण काही काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत.. तुम्ही तुमच्या आयुष्याचे काय करायला चालला आहात? किंवा त्यामध्ये काय जगत आहात .. ? हा पण विचार असला पाहिजे... असे नाही आहे कसे जगले पाहिजे हा विचार करता करताच आयुष्य संपून गेले पण .. तरीही .. काहीतरी असले पाहिजे आयुष्यामध्ये ज्याच्या मागे तुम्ही मनापासून लागला आहात.. आणि ते स्वप्नपूर्ती चा ध्यास तुम्ही घेऊन जगत आहात..
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असल्या तरी आपण एकाच बाजूचा नेहमी विचार करतो न .. ? मग तसेच काहीसे आहे प्रत्येक गोष्टीचे.. तुम्हाला हवी ती बाजू तुम्ही बघू शकता.. त्यातून पुढे जाऊ शकता.. आणि जी बाजू धरून आपण चाललो आहोत तेच मिळवणे अतिंम सत्य असेल तर .. त्याचा आनंद नक्कीच मिळत राहील आयुष्यात .. पण जर अतिंम ध्येय काय आहे हेच कळायला आयुष्य निघून गेले तर तो माणूस जगलाच नाही म्हणायचे का ? प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.. आणि त्याचा विचार करण्यापेक्षा.. आपण आयुष्य ठरवलेले जास्त चांगले नाही आहे का ?

Monday, October 11, 2010
चक्रव्यूह
आयुष्यात स्थिरता येणे म्हणजे नक्की काय असते ? म्हणजे आपण सेटल झालो आहे असे एखादा माणूस कशावरून ठरवतो? समाजाने केलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे झाले कि का खरच प्रत्येक माणसाच्या सेटल होण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. किंवा प्रत्येकाला वाटणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या असत असतील पण कराव्या लागणाऱ्या किंवा करता येणाऱ्या गोष्टी वेगळ्या असत असतील. समाजाच्या प्रत्येक व्याख्याच्या विरुद्ध बंड पुकारणे इतके सोपे थोडीच असते. पण तरी प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो कि आपण जे काही विचार केला होता आपल्या सेटल होण्याचा त्यातले काहीतरी मिळवले तर आयुष्यभराचे समाधान लाभेल. पण त्या स्वप्नाच्या लिस्ट मधली एक गोष्ट पूर्ण करता आली तरी खूप झाले नाही का ? म्हणजे शाळेत असताना काही कल्पना होत्या कि आपण इतके मोठे झालो कि या प्रकारचा माणूस झालेलो असू किंवा असे व्हायचे आहे. पण आता मागे जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार केला कि वाटत खरच मी स्वप्न पाहिलेले मी कोणीतरी होण्याचा खरच पूर्ण झाले आहे का ? का मी कोणीतरी पूर्णतः वेगळी माणूस झाली आहे. अर्थात, ज्यावेळी कोणीतरी होण्याच्या स्वप्न पहिली होती त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी माहितही नव्हत्या. पण स्वप्न पाहिण्याची स्वभाव गेलेला नाही आहे.. अजूनही मी प्रत्येकवेळी विचार करते कि अजून थोड्या वर्षांनी मी कसला माणूस असेन. मला खरच काही पडली असेल का जगात काय चालू आहे याची का मी पण असेच नॉर्मल स्वतः च्या भोवती एक फुगा करून आयुष्य जगत असेन. खरच मला सामाज्याने दिलेले आयुष्याच्या व्याख्येप्रमाणे जगायचे आहे का? त्यातून कुठले समाधान मिळणार आहे मला. माझा कोणीतरी वेगळ्या होण्याचा अट्टाहास नक्कीच नाही आहे पण तरीही काही स्वप्न आहेत माझी जी नक्कीच त्या व्याख्येत बसणारी नाही आहेत पण खरच मी ती मिळवू शकेन .. जे स्वप्नामध्ये माझे आयुष्य मी रचत आहे ते सत्यात उतरवण्याची ताकद राहील का माझ्याकडे ? जो माणूस मला व्हायचे आहे ते खरच बनण्याची माझी हिम्मत होईल का ? आता जी काही मी आहे ते मी स्वप्न पहिले होते का नाही माहित नाही मला पण अशी अवस्था परत न येण्यासाठी खरच मी ती स्वप्न मिळवेन का ? कुठल्याच गोष्टी तुम्ही कितीही प्लान केल्या तरी सत्यात येईपर्यंत ते स्वप्नच असते. आणि सत्यात येणारी प्रत्येक गोष्टी तुमच्या स्वप्नात असेल असे पण नाही.
मला ना स्वतः ला हरवून परत मिळवायचे आहे. हरवलेली मी आणि शोधणारी मी असे काहीतरी मला माझे रूप पाहिजे आहे. पण मोठे होणे तसे छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण आपल्या हातात राहत नाहीत नाही का ? लहानपणी आपण कितीदा आई चा हात सोडून पळालो असेन त्यावेळी ती किती सोपी आणि मजेदार गोष्ट होती पण आता कोणीही हात धरलेला नाही आहे तरी अदृश्य बंधने सोडून देणे किती अवघड होऊन जाते. अदृश्य बंधने वाटणारी हि बंधने सुरुवातीला आनंदाचा स्त्रोत वाटत असतात न हळूहळू ती आपले आयुष्य मांडणारी समीकरणे होतात कळतच नाही. अश्यावेळी खरच हरवल्यासारखे होते पण आईचा हात सोडून हरवणे नाही तर अभिमन्यूला चक्रव्यूह तून बाहेर निघणे माहित नसताना तो कसा हरवला असेल तसे काहीतरी. म्हणजे तुम्हाला माहित असते कि आपल्याला माहित नाही आहे यातून परत कसे यायचे आहे पण तरी आपण ते स्वीकारतो आणि एका क्षणी बाहेर निघणे केवळ हरवणे असते. मला असे वाटते कि सगळ्या जास्त त्रास कशाचा होत असेल तर ज्यावेळी परिस्तिथीच बरेचसे निर्णय तुमच्यासाठी घेते. मग ती असणारी मनापासून जपलेली स्वप्न कुठेतरी स्वप्नच राहून जातात. आणि एक नवीन माणूस तयार होत जातो आपलाच जे पूर्णपणे वाईट आहे असे नाही पण जे आपल्याला हवे होते ते पण नाही आहे नाही का ?

Sunday, September 26, 2010
बूमऱँॻ
साथ देणे म्हणजे नक्की काय असते ? कितीतरी वेगवेगळे अर्थ आहेत या शब्दामध्ये .. म्हणजे साथ हवी कुणाची तरी याची जाणीव होत नाही तोपर्यंत साथ देणे पण समजत नाही असे वाटते मला... पण साथ देणे याचा अर्थ कळायला बरेच दिवस जातात असे म्हणायला काही हरकत नाही .. म्हणजे आपण सगळे इतके सहज घेतो ना .. लहान असताना आई बाबांची साथ मिळत असते नेहमी.. नंतर मित्र - मैत्रिणी येतात.. ते सगळे असताना कधी जाणीव नसते झालेली कि हे सगळी लोक अशीच नाही आहेत आपल्या आयुष्यात तर ते आपल्याला साथ देत आहेत.. आणि मग आपण पण नकळत त्यांना साथ देत असतो.. पण या शब्दांची जाणीव नक्की होते कधी..ज्यावेळी तुम्ही खूप एकटे पडून जाता.. किंवा सगळे सोडून कुठेतरी दूर जाता.. मग लक्षात यायला लागते कि आपल्या बरोबर असणारी माणसे अशीच न्हवती आपल्या आयुष्यात .. त्यांच्या असण्याला काहीतरी नाव होते.. , मनात जागा होती.. , यांचे अस्तित्व कुठेतरी आपल्या आयुष्याशी जोडले गेले होते.. जे अचानक विस्कळीत झाले आहे.. असे काहीतरी.. म्हणजे आई बाबांबरोबर जवळ आपण आपले अर्धे आयुष्य जगतो.. पण त्या अर्ध्या आयुष्याचे महत्व कळायला अर्धा मिनिट पण लागत नाही एकदा तुम्ही लांब गेलात कि.. मित्र - मैत्रिणींचे पण काही वेगळे नाही आहे.. नुसते काही नेहमीचे शब्द जरी वापरत आली तरी असे वाटायला लागते कि किती गोष्टी आपण मागे टाकून आलो आहोत.. कितीतरी असेच राहून गेले आहे... काही काही गोष्टी अर्धवट आहेत.. तर काही पूर्ण कराव्या लागल्या आहेत.. माहित नाही .. असे अर्धवट सोडून दुसरे काहीतरी सुरु करणे किती चूक बरोबर पण गेलेल्या आयुष्याची किंमत ते गेल्यावरच कळते.. हे किती दुर्दैव असावे ना .. !
काही काही गोष्टी कळायला त्या आधी सोडाव्या लागतात असे म्हटले तर .. खरच इतकी मोठी किंमत मोजायची गरज असते .. ?? सगळे कसे मग बूमऱँॻ वाटायला लागते ना ? प्रत्येक वेळी आपण केलेल्या गोष्टीचा आपण हिशोब बरोबर करत असतो.. सगळ्याची किंमंत आहे ...आपल्या कडे असणाऱ्या गोष्टींची किंमत कळायला पण किंमत मोजावी लागते.. यापेक्षा अजून काय वाईट असू शकते.. पण कधी कधी मला असे पण वाटते कि त्यावेळी माहित असते कि एखादा माणूस आपल्या फक्त साथच देत नाही आहे तर स्वतःची सुख दुःख वाटत आहे ..आपल्याबरोबर तर खरच काही फरक पडला असता .. अन जर तो पडला असता तर त्याने चांगली गोष्ट साध्य झाली असती कि वाईट .. खरच जर- तर च्या गोष्टी नेहमीच व्यसन वाटत आल्या आहेत मला.. आपण आपल्याच मनाला समजून घालायचे एक रामबाण औषध वैगरे वाटते मला ते..कारण कुठल्याही वाक्यात जर-तर घातले कि हवे ते निष्कर्ष काढतात येतात.. आणि मनाची समजून हि घालता येते.. पण खरच विचार केला तर ते सगळे नुसते मृगजळ सारखे तर असते.. !
साथ देणे आणि साथ निभावणे पण कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत.. पण दोन्ही चे महत्व कळायला खूप वेगवेगळे अनुभव यावे लागतात .. प्रत्येक गोष्टीला असणाऱ्या दोन बाजू नेहमीच ट्रिकी असतात... कुठली बाजू आपल्याला पहिली अनुभवायला येईल तसे सांगणे अवघड पण.. माझ्या मते साथ हवी याची जाणीव आधी होत असावी... मग ती मिळावी म्हणून माणूस साथ निभावायला लागतो... जे इतके सोपे नक्कीच नाही आहे पण जर साथ मिळवायची इच्छा असेल तर त्याच्या दिशेने सोडलेले बूमऱँॻ तर असते.. ! परत येणाऱ्या निष्कर्ष ची वाट बघणे... एवढेच ते काय आपल्या हातात... !!!!

Tuesday, September 21, 2010
माणूस
माणसाची माणसे असतात कि माणसांचा माणूस असतो .. ??? कधी कधी विचार करायला गेलो तर आपण किती एकटे असतो या जगात.. कधी विचाराने, कधी माणसांमध्ये, कधी माणसामुळे, कधी घटनांमुळे अशी बरीच कारणे असतात ... त्या एकटेपणा मागे.. पण प्रत्येक वेळी आपण त्यातून परत यायचा प्रयत्न करत असतो .. आपल्याला एकटे राहायचे नसते.. किंवा एकटे राहणे वाईट गोष्ट आहे हे कोणी ठरवले असेल .. ??? आपण आपल्याला शोधणे इतके का वाईट असते का ?? कितीतरी प्रश्न पडतात.. खरच एकटे असताना माणसाला त्याच्याच विषयी किती नवीन गोष्टी सापडतात .. कितीतरी गोष्टी आपण कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात . कितीतरी माहित नसतात .. माणसात राहणारा आणि माणसांविषयी विचार करून एकटा राहणारा पण किती वेगळी व्यक्तिमत्वे आहेत ना ? माणसांमध्ये राहणारा माणूस माणसांचा होतो आणि एकटा राहणार्या माणसाची माणसे असतात असे म्हणता येईल का ? मोठी मोठी लोक माणसांचा माणूस असतात असे म्हटले तर गल्लीतला एकटा राहणारा म्हातारा सुध्दा गल्लीचा असतोच कि .. अगदी सगळ्यांचा .. कशावरून ठरते तुम्ही माणसांचे आहात का माणसे तुमची आहेत.. का प्रत्येक माणसामध्ये दोन्ही बाजू असतात .. कुठेतरी ... फक्त कधी कुठली डोक बाहेर काढते तर कधी कुठली . ? आपण समाजात राहताना इतका माणसांचा विचार करतो .. पण दुसरे ज्यावेळी सेम विचार करत असतात त्यावेळी आपण त्याच्यासाठी समाजातला भाग झालेलो असतो .. म्हणजे आपण दोन्ही भागात असतो .. माणूस बदलला कि .. विचार बदलला.. !
नेहमी आपल्याला चांगली बाजू दाखवून लोकांच्या नजरेत मोठे व्हायचे असते.. त्याची ओढ कुठेतरी "माणसांचा माणूस" होण्याचा प्रयत्न तर नसावा .. त्याला प्रत्येकाची अनुमती हवी असते .. किंवा त्याची असणारी माणसे काय विचार करतात हे त्याला कुठेतरी खूप जास्त महत्वाचे असते .. म्हणजे "माणसाची माणसे" खूप आधी येतात आयुष्यात .. पण माणसांचा माणूस होणे म्हणजे बर्याच गोष्टी आल्या. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोठे होणे आले . चुका करायचा अधिकार नाही कारण लक्ष नेत्रांचा पहारा आहे .. असे काहीतरी होऊन जाईल का ? समाज आपल्याला घडवतो तसेच आपण समाज घडवत असतो ... त्याचा भाग बनून .. त्यामुळे आपण नेहमीच दोन्ही बाजूला असणार आहे .. या सगळ्या गोष्टी कधीच जाणवल्या नसतात .. लहान असताना अचानक आपण मोठे होतो.. सगळ्यांचा नजरा निरखून आपल्याकडे बघत असतात .. पहिले थोडे घाबरत, नंतर थोडे सावरत आपण कसे या समाजाचे दोन्ही बाजू बनून जातो कळत पण नाही .. अश्यावेळी दुःख करावे कि आनंद साजरा करावा हाच मोठा प्रश्न होऊन बसतो ... हे मात्र खर .. !

Saturday, August 28, 2010
अवतार
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....
सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का? पण दिखाऊपणा त्याला अजिबात आवडतच नाही....तो धावता धावता तीन तासात डोंबिविलीहुन पुण्याला सहज जातो...आरामात...आणि फ़ुकटात....घाम येऊन त्याचे कपडे खराब होतील असंही नाही.
एकदा त्याने शंभर दिवसांचा उपवास ठेवला होता...तीन महिने अन्न-पाण्यावाचुन राहिला...आणि एकदा एका लग्नाला बुफ़े जेवणाच्या वेळी तो तीन तास जेवत होता....शेवटी सगळं संपलं म्हणुन थांबला.
त्याला जगातल्या सगळ्या भाषा अवगत आहेत...तो नुसताच बोलु शकत नाही तर प्रत्येक भाषेच्या साहित्यावर लेक्चर देऊ शकतो. कुठलाही अंक त्याने एकदा पाहिला की तो विसरत नाही. त्याला संपुर्ण लॉग टेबल पाठ आहे १३ डिजीट्स पर्यत.
तो अनेकदा माउंट एव्हरेस्टवर जाऊन आलाय....जाऊन काय म्हणायचं...त्याच्या शिखरावरुन खाली येतांना तो धावत धावत आलाय.
खरंतर कलियुगात झालेला कल्की अवतार तो हाच. पण मला सोडुन कोणालाही ते कळालेले नाहीये. जगात असलेला त्याचा एकमेव मित्र...म्हणजे मी. त्याच्याकडे इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की त्याला मित्र जमवायला वेळच मिळत नाही. अवतार असला तर काय झालं....काळाची बंधनं त्याला मनुष्यरुपात पाळावीच लागतात.
पण ह्या अवतारामधे कल्कीला नक्की काय करायचं आहे हे अद्याप कळालेलंच नाहीये. त्याला मी अनेकदा विचारायचा प्रयत्न केला..पण म्हणतो की खरंच त्याला कळालेलं नाहीये. त्याच्यामते तो जे ही करेल त्याने मनुष्यजातीचा उद्धारच होईल.
त्याच्याशी मी नेहेमी चर्चा करतो...समाजाच्या अवनितीबद्दल...भ्रष्टाचाराबद्दल... तो ऐकल्यासारखं करतो आणि लगेच विषय बदलतो. नितीमुल्यांचे अवमुल्यन हा जणु त्याच्यासाठी प्रश्नच नाही. द्वापारयुगात अर्जुनाला गीता सांगतिली, विश्वाचं रहस्य त्याच्यासमोर उलगडलं तसंच कधीतरी मलाही काही उपदेशाचे बोल ऐकायला मिळतील ह्या अपेक्षेत मी नेहेमीच असतो. पण त्याच्या विचारांमधे प्रगल्भता अशी कधी नसतेच. जे असते ते फ़क्त अचाट सामर्थ्याचे प्रदर्शन.
त्यादिवशी तो घरी आला. आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता कंटाळा आला म्हणुन म्हटलं की चला जरा लॉंग ड्राइव्हला जाऊन येऊ.
तो गाडी चालवत होता..मी बाजुला बसलो होतो. अचानक समोरुन एक ट्रक भरधाव आला....अपघात अटळ होता...मरण निश्चित दिसु लागले...पण तेव्हढ्यात कल्कीने गाडी अक्षरक्ष: हवेत उंच उडवली आणि ट्रकच्या वरुन आम्ही पुन्हा रस्त्यावर आलो. फ़क्त काही क्षणांतच मरणाच्या दारात जाऊन परतल्यासारखे वाटत होते...हृदयाची स्पंदने वाढली होती...घाम फ़ुटला होता. कल्की ने रस्त्याच्या बाजुला नेऊन गाडी थांबवली. गाडीत असलेली पाण्याची बाटली मला दिली. पाणी पिऊन थोडं बरं वाटलं. एक कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात दाटुन आला होता..कल्कीचे मी आभार मानु लागलो. खरंतर खुप औपचारिकता शब्दांमधे जाणवत होती....पण मला ते बोलावेसे वाटत होते.
"आज तु जर नसतास, तर माझी दुनियेतुन गच्छंती अटळ होती. तुझे आभार मानावेत तेव्हढे कमीच. खरं सांग तु माझ्यावर इतका कृपादृष्टी ठेऊन का आहेस? जगात तुला दुसरा मित्र मिळालाच नाही कधी?"
"गप रे...फ़ालतु मधे सेंटी नको मारुस. कृपादृष्टी, आभार...कसले मोठे मोठे शब्द वापरतोस रे. आणि आपली मैत्री काय मी निवडली आहे? आपण शेजारी...तुझ्यानंतर १५ दिवसांनी मी जन्मलो, एकत्रच वाढलो...एकत्र खेळलो..दुसरं कधी होतंच कोण?
"कोणीही नव्हतं? शाळा, कॉलेज, शेजारपाजारचे इतकी मुलं...कोणाशीच मैत्री करावीशी वाटली नाही? बघावं तेव्हा आपल्या दुनियेत. आज ह्या झाडावरुन उडी घेतली...उद्या कारबरोबर धावायची स्पर्धा केलीस..तुझं काहीतरी वेगळंच असायचं"
"बरं मग? मला त्यातच मजा वाटते..मी काय करणार?"
"खरं सांगु? तुझ्या बोलण्यावरुन कधीही तु अवतारी पुरुष वाटत नाहीस. अचाट ताकदीचा स्टंटमॅन वाटतो."
"बरं..मग?"
"मग काय? तु मलाच का सांगितलंस की तुच तो अवतारपुरुष कल्की आहे? खरं सांग. प्लिज"
"कसला चिवट आहेस रे तु..मी तुला सांगितलं कारण तु मला सगळ्यात जवळचा आहेस आणि तु हे कोणाला सांगणार नाहीस म्हणुन. माझ्या शक्ती मी तुझ्यापासुन लपवु नाही शकलो कधी."
"पण तुझ्या शक्तींचा उपयोग काय? कार डिलरशिप मधे सेल्स मॅनेजरची नोकरी करण्यात तुला आयुष्य वाया घालवायचं आहे का?"
"पोटापाण्यासाठी करावंच लागतं....आणि शक्तीचा उपयोग म्हटलंस तर आताच वाचवलंय मी आपल्या दोघाना"
"अरे पण इतके लोकं आहेत जगात...गरीबीने पिचलेले, इतके शोषित समाज आहेत. त्यांना काय उपयोग तुझ्या शक्तीचा?"
"किती वेळा हा प्रश्न विचारणार आहेस?"
"जोवर तु उत्तर देत नाहीस तोवर...आणि असली सामान्यांसारखी उत्तरं देऊ नकोस...तुच होतास ना गीता सांगणारा?"
"मग काय तुला पुन्हा गीता ऐकवू?"
"नाही...तु फ़क्त माझ्या प्रश्नांच उत्तर दे."
"तर ऐक मग...तुला जे जग दिसतं ते मला दिसत नाही. आपल्या जाणिवा वेगळ्या आहेत. ज्या ऐहिक दृष्टीकोनातुन सुख-दु:ख बघतोस तो मला हास्यास्पद वाटतो. कोणी गरीब म्हणुन तो दु:खी असं मला वाटत नाही."
"हे तर नुसते शब्दांचे बुडबुडे आहेत...ज्याला दिवसरात्र काबाडकष्ट करुन पोटभर खाताही येत नाही अशी लोकं एकीकडे...आणि ज्यांना जेवण पचत नाही म्हणुन डायट कंट्रोल करणारी लोकं दुसरीकडे...असं का?" माझ्यातला समाजवादी जागा झाला होता.
"बरं...मग तुला काय वाटतं? मी प्रत्येकाच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी? अरे जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हवा, पाणी ह्यांचा प्रबंध केलाच ना? स्वत:चे अन्न मिळवावे म्हणुन थोडे कष्ट पडले तर मला दोष?"
"प्रश्न नुसत्या अन्न-पाण्याचा नाहीये. श्रमप्रतिष्ठेचा पण आहे. मरमर कष्ट करणारा कष्टकरी...त्याची समाजात काय प्रतिष्ठा असते? लाचारीचं जीवन असतं त्याचं."
"प्रतिष्ठा, लाचारी वगैरे गोष्टी तुम्ही मानवांनी निर्माण केल्यात....आणि त्यात स्वत:ला गुरफ़टवुन घेतलंय..त्यात माझी काय चुक?" प्रथमच काहीतरी गुढ अर्थ असल्यागत कल्की बोलल्याचे मला जाणवले.
"बरं मग एक सांग....तुला स्वत:ला असं अपमानास्पद आयुष्य चालेल?"
"अपमानास्पद? हा शब्द मला लागुच होत नाही. पुन्हा सांगतो ह्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्यायत. आणि तुम्हाला त्या करता येतात ह्याचं स्वातंत्र्यच मुळात मी दिलंय. नवनिर्मीतीचं स्वातंत्र्य मी मनुष्याला सर्वाधिक दिलंय. त्याचा बरावाईट उपयोग करणं हे तुमच्या हाती आहे...त्यातुनही सृष्टीचा तोल ढळला मी अवतार घेतोच सगळं ठीक करायला. मुळात तु जो विचार करतोयेस ना...तोसुद्धा माझ्याच निर्मीतीचा आविष्कार आहे. मनुष्य ही माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे."
"एक साधी गोष्ट आहे...तु काहींना खुप दिलंस आणि काहींना काहीही नाही. मेळघाटात कुपोषणाने बळी जातोय...इथे शहरांमधे खाऊन खाऊन लोकं माजलेत. हा पण तुझ्या नवनिर्मीतीचा आविष्कार म्हणायचा की काय?"
"मी दिलं?"
"काही श्रीमंत घरात जन्म घेतात, काही गरीब घरात...काहींना जन्मत: अपंगत्व असतं...हे कशामुळे?"
"हे बघ, मी फ़क्त ह्या सृष्टीचा रचनाकार आहे. मी फ़क्त प्रक्रिया बनवल्या आहेत ज्यामुळे ही सृष्टी टिकुन राहिल. जन्म-मृत्यु हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्या प्रक्रियेमधे काय होतं ह्यात मी तोवर ढवळाढवळ करत नाही जोवर माझ्या सृष्टीला धोका निर्माण होत नाही. गरीब श्रीमंत ह्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत. अपंगत्वाबद्दल म्हणशील तर जीव जन्माला येण्याच्या प्रक्रियेतही काही अपघात होऊ शकतात, त्यामुळे तसं होऊ शकतं..जन्माला आल्यानंतर जसे लोकं अपघाताने अपंग होतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे."
"आमच्या जीवनात ये काही होतं त्यावर तुझं काहीही नियंत्रण नाही असं म्हणायचंय तुला?"
"अर्थात...काहीही नियंत्रण नाही. मी सृष्टीची निर्मीती करतांनाच अशी योजना केलीय की सृष्टीतले प्रत्येक सजीव, निर्जीव, वातावरण हे एकमेकांना पुरक ठरुन सृष्टी टिकवुन ठेवतील. मानव हा ह्या सृष्टीत निर्माण केलेला निर्मीतीक्षम जीव. मी पुन्हा सांगतो सृष्टीला धोका निर्माण झाल्यावरच मी ढवळाढवळ करतो"
"तुच म्हणतोस ना...की मानव निर्मीतीक्षम आहे? हो आहोत आम्ही निर्मीतीक्षम...आम्हीच कदाचित आमच्या जीवनात नवनवे प्रश्न निर्माण केले आहेत. सुख-दु:ख सगळे आम्हीच आमच्या जीवनात निर्माण केलेत. आम्ही आमच्या मायावी जगात जगतोय. पण त्या जगाला ठिक करायची क्षमता आमच्यात नाही ना..आम्ही अतिमानवी शक्ती घेऊन अवतार नाही ना घेऊ शकत. ह्या आम्हीच निर्मीलेल्या आमच्या समाज-जीवनाला सुधरवायची क्षमता आमच्यात कुठे दिलीस तु?"
"तुला काय वाटतं? मार्क्स, गांधी कसे निर्माण होतात? तुमच्यातुनच एखादा उठतो आणि सुधार आणतोच ना? मार्क्स-गांधी निर्माण मी नाही करत. तुमच्याच समाजातुन ते निर्माण होतात. तुमच्याकडे क्षमता सगळ्या आहेत, फ़क्त काहींनाच त्याची जाणीव होते, काहींनाच नेमकं काय चाललंय ते कळते आणि ते तुमच्या जगाला सुखकर बनवायचा प्रयत्न करतात."
"म्हणजे आम्ही नेहेमीच कुठल्यातरी गांधीची वाट पाहत रहायची...नाही का?"
"तेच तर म्हणतोय मी...तुमच्या प्रत्येकात गांधी बनायची क्षमता मी दिलेली आहे. तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बना. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही."
"बरं मग तुझं अवतार प्रयोजन काय? मला तर वाटायला लागलंय की देवही आता आमच्या मदतीला येणार नाही."
"माझ्या अवताराचं प्रयोजन? मी मानवजातीच्या उद्धाराला आलेलो नाहीये. धर्माच्या उद्धारासाठी आलोय?
"धर्म मानवनिर्मीत नाहीये?"
"धर्म म्हणजे तुला काय वाटतं?"
"धर्म म्हणजे नीती-संस्कार-आध्यात्म-नियम"
"वरवर पाहता हे तसंच वाटतं...पण ह्यांचा उगम कुठे आहे?"
"कुठे म्हणजे? आमच्या मानव-समाजात लोकांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे म्हणुन आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ह्या"
"हेच सगळे तुमचे भ्रम असतात. धर्म ही मानवनिर्मीत गोष्ट नाही. मानवच काय ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट सृष्टीच्या नियमांना बांधील आहे. ती तशी रहावी ह्याचा प्रबंध मी आधीच केलेला आहे. त्या प्रेरणा मी प्रत्येक सजीव-निर्जीवामधे टाकलेल्या आहेत. आणि त्या प्रेरणेतुनच धर्माचा उदय होतो. पण मानव ती प्रेरणा विसरत चाललेत...किंबहुना आपल्या नव्या जगात इतके गुरफ़टलेत की त्या प्रेरणा त्यांना महत्वाच्या नाही वाटत. त्यातुनच सृष्टीचा तोल ढळलाय"
"हे जरा विनोदी वाटतयं...इतकी मोठी सृष्टी...इतके ग्रह-तारे..मानवाला ह्या विश्वात स्थान तरी आहे का? तुझ्या सृष्टीचं रुप पाहिल्यावर किती खुजेपणा जाणवतो हे तुला नाही कळायचं...मानवामुळे सृष्टी धोक्यात येऊच शकत नाही...फ़ारफ़ार तर पृथ्वी धोक्यात येईल...आणि त्यामुळे काही फ़रक पडेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही आधीही नव्हतो आणि नंतरही कदाचित नसु. सृष्टी तर चालतच राहिल"
"तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना?"
"असं कशावरुन?"
"मी म्हणतोय की मनुष्य माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे आणि तु म्हणतोस की मनुष्यावाचुन सृष्टी चालेल? अरे हे जे ग्रह-तारे दिसताहेत ना तुला...त्या सगळ्यांच्या प्रभावातुन मी पृथ्वी आणि त्यावरील मनुष्यसृष्टी निर्माण केलीय. ह्या पृथ्वीला नष्ट करु देईल मी?"
"मग तु काय करायचं ठरवलं आहेस? तुझं अवतार-कार्य काय?"
"माझं अवतार कार्य? ऐकायची हिंमत आहे?"
"हो..सांग"
"मनुष्यजातीचा अंत."
"काय? आताच तर तु म्हणालास की तुझी सर्वोत्कृष्ट निर्मीती?"
"हो..आजवरची सर्वोत्कृष्ट..पण यापुढे यापेक्षा चांगली निर्मीती होणार नाही असं नाही. मानवी समाजाचा अंत हेच माझं कार्य...एका नवीन जीवाचा उदय व्हायची वेळ आहे ही."
"मग? तो जीव निर्माण झालाय? कुठे आहे?"
"मीच तो. तुला मी अमानवी वाटतोय ना? आहेच मुळात...माझ्यात अनेक अमानवी शक्ती आहेत..माझे अवतारकार्य फ़क्त त्या शक्तींची चाचपणी करणे एव्हढंच आहे."
"म्हणजे आमचा अंत जवळ आहे तर."
"हो..अर्थात त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्हीच आपापसात लढुन मराल. पण त्याआधी तुमच्या मारामाऱ्यांना पुरुन उरेल असे सजीव सृष्टीत निर्माण करायला हवा."
"म्हणुन त्या नवीन जीवाला इतक्या शक्ती दिल्यात तर"
"फ़क्त तेच एक कारण नाहीये...मानवाला मी थोडे दुर्बल बनवले होते...तो सृष्टीवर खुप अवलंबुन होता...पण आपल्या अस्तित्वासाठी मग तो सृष्टीचेच लचके तोडु लागला. नवा जीव शक्तीशाली असेल. त्याला स्वत:च्या अस्तित्वासाठी सृष्टीला ओरबाडावे लागणार नाही."
"आता ह्यावर काय म्हणावं याला मी? आमच्याकडे किती वेळ आहे?"
"वेळ? मी आधीच सांगितलंय की तुम्ही आपापसातच लढुन मराल...त्याला जितका विलंब करता येईल ते तुमच्या हातात आहे. मी तुमच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही."
"ठीक आहे तर मग...चल परत जाऊ...घरी जाऊन निवांत मरायची वाट पाहतो मी"
"पाहिलंस? सत्य जाणुन घ्यायची तुला किती उत्सुकता होती? पण सत्याला सामोरे गेल्यावर कसा हिरमोड झाला तुझा."
"हिरमोड होणारच ना? जगात एकाच शक्तीवर विश्वास होता...तोही उडालाय आज. दु:ख आमच्या विनाशाचं नाहीये. तुच निर्माण केलं आहेस, तुच जीवन दिलंस..आम्हाला संपवायचा अधिकारही तुलाच आहे. पण आम्हाला आमच्यातच लढुन मारायचा काय अर्थ?"
"कारण एकच..मी आणि माझ्यापासुन निर्माण होणाऱ्या नव्या जीवांच्या समोर उदाहरण असावं..कसं जगु नये ह्याची माहिती त्यांना प्रत्यक्ष व्हावी. नाहीतर मानवांसारखे तेही वेद कोणी लिहिलेत ह्यावरुन मारामारी करायचे"
"उपरोध ध्यानात आलाय.. गाडी वळव कल्की...घरी जाऊयात"
कल्कीने गाडी वळवली. परत जातांना मी शांत बसुन होतो. काही बोलायची इच्छाच होत नव्हती. डोक्यात विचारांचे काहुर माजले होते. आज कल्की बरोबर गेलोच नसतो तर बरं झालं असतं असं मला वाटलं..कल्की कडुन खुप अपेक्षा होत्या मला...सगळ्यांनाच तडा गेला...महाभारतातल्या कृष्णार्जुनाप्रमाणे कल्की आणि माझी मैत्री आहे असं मला वाटायचं...मीच त्याचा एकमेव मित्र होतो. पण तो मला आणि माझ्या भाऊबंधाच्या मदतीसाठी आलेलाच नव्हता. उलट आमचा विनाश व्हायची वाट पाहत होता.
पण शेवटी पर्याय नव्हताच. मानवी विनाश टाळायला आता पुन्हा गांधी जन्मणे शक्य नव्हते.
कल्कीला माझ्या मनात काय चाललंय याची पुरेपुर माहिती होती. तो म्हणाला
"दुसऱ्या महायुद्धानंतर... ज्या दिवशी गांधीहत्या झाली....त्यादिवशीच मी हा निर्णय घेतला होता"

Subscribe to:
Posts (Atom)