माझ्या तरुण मित्रांनो,
तरुण शरीरानी, मनानी, विचारांनी ......मित्रांनो मी कुठेही वयानी म्हणालो नाही.
आपण
किती दिवस लहान राहायच ? किती दिवस आईच्या पदराखाली राहायच ? चला आज आपण
जरा वेगळा विचार करु या. मी माझे विचार मांडतोय. मला तुमचे त्यावर मत
ऎकायला नक्कीच आवडेल.
माझे दोन मित्र आहेत. माझ्यापेक्षा थोडे मोठे. एक आहे ललित भाटिया व दूसरा आहे अमित देशमुख.
ललित
तसा डोक्यानी बरा, खुप हुशार नाही. पण टाकाउसुद्धा नाही. ५ वी पासून
त्याच्या सुज्ञ वडलांनी त्याला त्यांच्या एका मित्राच्या दुकानात अर्धवेळ
नोकरीला लावल. ८ वीत असतानाच त्यानी घरीच स्टेशनरीचा धंदा चालू केला. कुठून
तरी वह्या, पुस्तक, बाकी स्टेशनरी आणायचा व विकायचा. बोलण खुप चांगल. शाळा
कॉलेजमधे जाउन तो स्टेशनरी विकायचा, ऑफ़िसेसमधे विकायचा. बघता बघता त्यानी
एक लहानसा गाळा भाड्यानी घेतला, पुढे तोच गाळा विकत घेतला. हे सर्व करत
असताना तो शिकत असायचा. मी कधीतरी त्याच्या दुकानात जायचो. हा ललित एकाच
वेळी लोकांकडून पैसे घ्यायचा, हिशोब करायचा, सुट्टे बिनचूक द्यायचा,
गिर्हाईकांशी बोलायचा, माल घेउन आलेल्या विक्रेत्याकडुन हिशोब करुन माल
घ्यायचा व हजारो रुपये एकदा अथवा दोनदा मोजुन द्यायचा. मी मात्र माझ्या जवळ
असलेल्या १०-१० च्या ८ नोटा, परत परत मोजुन त्याला द्यायचो. ललितच्या
चेहर्यावर नेहेमी उत्साह असायचा, एक आत्मविश्वास असायचा. त्याला एकदा
विचारल की ललित तू पैसे कसे इंव्हेस्ट करतोस? त्यानी मला सर्व प्लान
सांगीतला. त्याच्याकडे पैसे साठवायचा, ते वाढवायचा, धंद्यात परत गुंतवायचा व
धंदा वाढवायचा सर्व प्लॅन तयार होते.
अमितदादा
हा प्रचंड हुशार होता. त्याचा कधी कधी मला खुप राग यायचा. कितीही कठिण
गणित द्या दादा ते तोंडीच सोडवायचा, कोणतही कोड सांगा लगेच उत्तर तयार.
त्याला या बाबतीत हारवायच कधी सुख मिळालच नाही. दादा BE ला युनिव्हर्सिटित
पहिला आला. त्याला पहिलाच पगार ६५०००/- रु. मिळाला. वडलांना रिटायर होताना
६०००/- रु. पगार होता. दादा व घरचे सर्व खुश झाले. मोठी पार्टी दिली. मी
मदतनीस होतोच. सर्वात शेवटी कॉंट्रॅक्टरला द्यायचे पैसे तयार ठेवायचे होते.
दादानी मला मदतीला घेतल. द्यायचे पैसे मी, त्यानी त्याच्या आई, बाबांनी
परत परत मोजले. कमीत कमी ते १२०००/- रुपये आम्ही १० वेळा मोजले असतील. पैसे
दिल्यावर त्याच्या आईनी दादाला विचारल "अमित तुझी खात्री आहे न की तू पैसे
बरोबर दिलेस ?" दादाचा चेहराच उतरला. मी दादाला विचारल "दादा तुला इतका
जास्त पगार आहे. तू या पैशाच काय करायच ठरवल आहेस? त्याचा विनियोग कसा
करणार?" आता माझा दादा एकदम बावळट वाटायला लागला. चेहर्यावरची हुशारी,
डोळ्यातली चमक, बोलण्यातला हजर जबाबीपणा सर्व पार निघुन गेल. दादा
केविलवाणॆपणे म्हणाला "नाही रे मी यावर विचारच केला नाही"
माझ हे म्हणण नाही की शिक्षण उपयोगी नाही पण व्यवहार ज्ञान नसणं.....
दादाला पुढेमागे हे व्यवहार ज्ञान येईलच पण तो पर्यंत ललित त्या ज्ञानात किती तरी पुढे निघुन गेलेला असेल.
माझ्या
मित्रांनो, जरा विचार करा, आपण कुठे मागे पडतोय ? आपण त्याच त्या एकाच पाय
वाटेनी चालत राहाणार का ? शाळेत जायच, खाली मान घालुन अभ्यास करायचा, १०
वी-१२ वी व्हायच आणि पुढील शिक्षणाच्या व आयुष्याच्या एका अंधार्या जगात
शिरायच.
आपण
नोकरी करा, अथवा व्यवसाय करा सारासार विवेक बुद्धी (commonsense ) फ़ार
आवश्यक आहे. आणि ही चाकोरी बद्ध जिवनातून तयार होणं शक्यच नाही.
आजच्या
गतिमान जगात तुम्ही तुमच्या जिवनाचा मार्ग जितक्या लवकर निवडाल व जितक्या
लवकर त्यात स्थिर-स्थावर व्हाल तेव्हढ तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी
व्हाल.
संधीचे घोडे खुप जोरात पळतात, त्यावर आरुढ व्हायच का त्या घोड्याच्या लाथा खात जगायच हेच फ़क्त ठरवायच आहे.
यासाठी काय कारायच ? तेच आपल्याला डिस्कस करायच आहे.
१. वेळेचा योग्य उपयोग करा
सर्वात
पहिल, आपला सर्वात जास्त वेळ खाणारा मोबाईल फ़ेकुन द्या. हायजिनीकली तर तो
वाईट आहेच, ते मी तुम्हाला वेगळ सांगायला नकोच. पण ह्या मोबईल कंपन्या
आपल्याला त्याचं एक व्यसन लावतायत हे लक्षात घ्या. एका व्यक्तीला किती SMS
करावे लागतात ? मला काही मित्र माहिती आहेत जे दिवस भर मोबाईल घेउनच बसलेले
असतात.
कॉंप्युटरवर
नुसते गेम खेळु नका. त्यावर रोज निदान एक तरी प्रोग्राम करा. एका तरी
विषयाची नवी माहिती मिळावा. याला फ़ार तर फ़ार ३० मी. लागतील.
आपल्या
दिवसच्या वेळेच टाईम टेबल करा. त्यात रिकामा वेळ असु द्या. तुमच्या बिझी
वेळचं व रिकाम्या वेळचं योग्य प्रमाण असु द्या. खेळ आवश्यक आहेच.
वेळेचा विनियोग यावर आपण वेगळी चर्चा करु या.
२. जास्तीत जास्त माहिती मिळावा.
मला
एक सांगा, आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणींचे आई-वडिल काय करतात ? कोणत्या
क्षेत्रात आहेत ? याची माहिती आहे का? आपण कधी त्यांच्याशी त्या विषयावर
चर्चा केली आहे का ? नसेल तर करा. आपल्याला नक्कीच ५-१० निरनिराळ्या
क्षेत्रांची माहिती मिळेल. त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपण त्या संबंधात
जास्त महिती इंटरनेटवर मिळवा.
मी
एकदा कलकत्याला जात होतो. बाजुला एक आजोबा बसलेले होते. आजोबा खुप कमी
बोलत होते. मी त्यांना विचारल तेव्हा समजल की ते एक्झिम बॅंकेमधे मोठ्या
हुद्यावर होते. मी त्यांना विचारल "एक्झिम बॅंक नक्की काय करते, आयात
निर्यात क्षेत्रावर ती कसा कंट्रोल ठेवते, व निर्यात करण्यासाठी कस
उद्युक्त करते?" आजोबांना हा प्रश्न माझ्याकडुन नक्किच आपेक्षीत नव्हता.
आधी नुसतच त्यांनी हासुन सोडुन दिल. पण नंतर त्यांनी मला बरीच माहिती दिली.
काही मला समजली काही नाही. पण जी समजली ती सुद्धा बरीच होती. माझी खात्री
आहे ही माहिती नक्किच फ़ुकट जाणार नाही.
३. सुट्टीत थोडे तरी पैसे मिळ्वायचा प्रयत्न करा.
आपल्या ज्ञानाच्या जोरावर, जे आपण शिकलो त्याच्या जोरावर काही तरी कमवा.
अ ) आपल्या भाषा चांगल्या असतील तर भाषांतराच काम करा, वेब साईट कंटेंट राईटींगच काम करा.
ब ) गणित सायन्स चांगल असेल तर क्लासेसला नोटस् काढुन द्या. आज कितीही
मोठा व कितीही नावाजलेला क्लास असला तरी त्यांना नोट्स् काढणं व त्या
अप्टुडेट ठेवण खुप कठीण जात. त्यांना अशा प्रकारच काम करणारी मंडळी हवीच
असतात. यात बरा पैसा मिळतो.
क ) आपल्याकडे शिक्षण कमी असेल तर, ऑफ़िसेस , बॅंका व शाळांच्या स्टाफ़ला घरगुती पदार्थ खायला घेउन जा. यात खुप पैसा आहे.
ड ) आपल्याकडे गावाला जागा असेल तर वर लिहिलेल्या लोकांसाठी सहल आयोजित करा.
ई ) निरनिराळ्या पर्यटन क्षेत्रांची नीट माहिती मिळावा व पर्यटान गाईड (या साठी इंग्रजी नीट असाव)च काम करा.
फ़ ) आपल्या जवळपास असलेल्या वृद्ध पण सधन लोकांना औषध आणुन देण, सामान
आणुन देण, विज बिल, फ़ोनच बिल भरण या सारखी काम करा. यात पैसा भरपूर आहे.
आपल्याला पैशाची गरज असो वा नसो या पैसे कमावण्यानी आपलं व्यवहार ज्ञान नक्किच वाढेल, एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल.
या सुट्टीत करुन बघा, पुढिल वर्षाच्या शिक्षणाची सोय करा, निदान आपल्या पॉकेटमनीची सोय करा.
आपल्याला जर पैशाची गरज असेल व वर्षभर शिकताना काही उद्योग हवा असेल तर हाच उद्योग तसाच पुढे चालु ठेवु शकता.
कदाचित याचाच उपयोग आपल्याला शिक्षणानंतर लवकर स्थिरस्थावर व्हायला होईल.
४. एका तरी व्यवसायाचा सखोल अभ्यास करयचा प्रयत्न करा.
आपल्या
जवळच्या दुकानाचा व्यवहार, एखाद्या कारखान्याचा व्यवहार याचा अभ्यास
करायचा प्रयत्न करा. आपल निरिक्षण व समज याच्या जोरावर त्या व्यवहारात
असलेल्या त्रुटी शोधा, योग्य माणासापाशी व योग्य पद्दतीनी तुमच निरिक्षण व
तुमचा त्यावर असलेला उपाय सुचवा. कदाचित तुमचा उपाय त्यांनी आधीच करुन
पाहिला असेल, चर्चा होईल तुमच ज्ञान नक्किच वाढेल.
वेगळा विचार करायची सवय लागेल. जी तुमच्या पुढच्या आयुष्यात नक्किच उपयोगी ठरेल.
५. थोड तरी सोशल वर्क करा
आपल्या
जवळपास असलेल्या एखाद्या समाजोपयोगी संस्थेबरोबर या सुट्टीत काही तरी काम
करा. वृद्धाश्रमात जा, हॉस्पिटलमधे जा. बघा तुमचा आउट्लुक सगळा बदलुन जाईल.
जेव्हा
तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी बोलता तेव्हा तुमचा common sense नक्कीच
वाढत असतो. निरनिराळ्या वयोगटातल्या लोकांशी, कमी जास्त समज असलेल्या
लोकांशी, कस वागायच हे समजत जात.
व्यवहार व सोशल वर्क याची कधीच गल्लत करु नका. सोशलवर्कमधुन कधीच पैशांची आपेक्षा करु नका व व्यवहारात कधीच सोशलवर्क करु नका.
६. आपल्या पुढील आयुष्याची थोडी तरी रुपरेषा तयार करा.
आपल्याला
पुढच्या आयुष्यात कोण व्हायचय ? आपलं आवडत क्षेत्र कोणत आहे ? त्या
क्षेत्रात तज्ञ होण्यासाठी किती मेहनत व पैसे लागतात? पुढे त्या क्षेत्रात
कसे प्रॉस्पेक्टस् आहेत ? या सर्वाची एक ढोबळ रुपरेषा आपल्याजवळ तयार असणे
गरजेचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या कमीत कमी एका तज्ञ व्यक्तीशी
आपली चर्चा झालेली असली पाहिजे. नक्कि कोण तज्ञ आहे व कोण फ़क्त हवेत बोलतय
हे तर समजण फ़ार फ़ार आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला थोड तरी आपल क्षेत्र
माहिती असण , लोकांशी बोलायची व अॅनलिसिस करायची सवय असण गरजेच आहे. हे
सवयीनीच होत.
परदेशातली
मुल फ़र लवकर आपल्या पायावर उभी असतात व त्यामुळे खर्या अर्थी आपण
त्यांच्याशी कधीच स्पर्धा करु शकत नाही. भारतिय लोकांना परदेशात नोकर्या
मिळातात त्या फ़ार लोलेव्हलच्या असतात व ज्या असतात त्या कमी पैसे देत
असतात. आता ब्राझिल सारख्या अती गरिब देशातुन अमेरिकेत नोकर्या करण्यासाठी
जेव्हा लोक यायला सुरुवात झाली, तेव्हा आपल्या लोकांच्या नोकर्यांवर हळु
हळू गदा येत चालली आहे.
महाराष्ट्रात असलेले उद्योग भराभर परदेशी लोकांच्या हातात जातायत. जर आपण वेळॆवर जागे झालो नाही तर मग आपली स्थिती कठीण आहे.
जग हे एक सिव्हिलाइज्ड जंगल आहे. त्यातला जंगल कायदा समजुन घ्या. इथे कोणी कोणावर दया दाखवणार नसतो. त्यात कस जगायच हे जाणुन घ्या.
निरंजन
No comments:
Post a Comment