आपल्या समाजात एकीकडे बर्याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.
आपल्या समाजात भ्रष्ट नेता, पैसे खाणारा अधिकारी, गुंडगीरी करणारा व स्त्रीयांवर बलात्कार करणारा वा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.
वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही. मी या बाबतीत काही काम करतो म्हणल्यावर माझ्या अनेक मित्रांनी माझ्याशी संबंध तोडले. ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.
आपल्या सुशिक्षित समाजातसुद्धा ( अर्थात सुशिक्षित कोणाला म्हणायच हा प्रश्नच आहे ) हीच कल्पना आहे की, या प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते हे वेश्येकडे जात असलेच पाहिजेत. आपल्या समाजात कोणी नुसती कुजबुज केली, की अमका अमका माणूस वाईट आहे, त्याच्या चारित्र्याबाबत बोलल की लगेच ऎकणार्याला खर वाट्तं, पण एखादा माणूस खुप चांगला आहे अस म्हणल. तर "काय सांगाव, खर खोट त्या प्रमेश्वरालाच माहिती" असा लगेच रिमार्क येतो.
एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देतोय. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे. तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते. एखाद्या लग्न मोडलेल्या व्यक्तीबाबत वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. घटास्पोटित व्यक्तिंना अपमानीत वागणुक मिळते. एखाद्या मुलं न झालेल्या जोडप्याकडे समाज अशा नजरेनी बघतो की त्यांना मेल्याहुन मेल्यासारखं होतं. मला एक कार्यकर्ता माहीती आहे की ज्याच लग्न, तो HIV ची माहिती तरुण वर्गापर्यंत नेण्याच काम करतो, या एकाच कारणास्तव तीन वेळा मोडल आहे.
माझी एक विद्यार्थिनी आहे, ती एका वेश्येची मुलगी आहे. ही वेश्या हैद्राबादच्या खानदानी वेश्या कुटुंबातली आहे. (यात सुद्धा खानदानी हा प्रकार आहे बरं का ! ) त्यांचे संबंध पूर्वी राजे रजवाड्यांशीच असायचे, सध्या ते असतात मोठ्या उद्योगपतींशी. ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला. या मुलीच्या मागे मुलं नाही लागली तरच नवल. पण अनेकजण ती एक वेश्येची मुलगी आहे, तेव्हा तीची छेड काढायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे, असाच अर्थ घेतात व तीच छेड काढायचा प्रयत्न करतात. कॉलेजचे प्रोफ़ेसरसुद्धा यात मागे नाहीत. आज ही समाजाची विचारसरणी आहे.
वेश्यागृहातुन सोडवलेल्या बाईला व तीच्या मुलांना कामं मिळत नाहीत. चांगल शिक्षण मिळत नाही.
हिजड्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. आणि त्यामुळे यांच पुनर्वसन खुप कठिण जात. एक असा गैरसमज आहे की हिजड्याच तोंड पाहिल की दिवस खराब जातो, त्यांना जादू टोणा चांगल्यापैकी माहिती असतो. या समजांमुळे समाजानी यांना खुप दूर ठेवलेल आहे. त्यांच्या वस्त्या ह्या वेश्या वस्त्यांच्या जवळ असतात. काही वर्षांपूर्वीच हिजड्यांना कायद्यानी मान्यता देऊन त्यांची मतदार म्हणून नोंदवणी केलेली आहे. त्यांना रेशन कार्ड मिळालेली आहेत. पण तरी हे काम खुप कमी पडत. मी काही हिजडे हे खुप शिकलेले पाहिलेले आहेत. त्यांना शरिर विक्रय करायच नसत. भिकमागुन जगण नको असत. त्यांना आपल्यासारख काही चांगल काम करायच असत. मेहनतीनी पैसे मिळवुन खायच असत. आपेक्षा फ़ारच थोडी असते. पण ही माफ़क आपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग यांचा संबंध येतो तो वेश्या व गुन्हेगार यांच्याशी.
काही वर्षांपूर्वी माझी समजुत अशीच होती की, हिजडे एकमेकांशी बोलताना अत्यंत घाण शिव्या, शाप देत, गलिच्छ अंगविक्षेप करत बोलतात.
एकदा मी मुंबईला स्कुटरनी जात होतो. स्कुटर सिग्नलपाशी थांबवली व मी सिग्नल मिळायची वाट बघत होतो. बाजुला गटाराच्या जवळ दोन हिजडे भिक मागुन मिळालेल खात होते. मला हिजड्यांचा प्रचंड राग होता व किळस वाटायची. मी त्या दोघांकडे तुच्छतेनी पाहिल आणि पचकन थुकलो.
या दोन हिजड्यांच बोलण मला ऎकायला येत होत. ते हिंदी बोलताना मधेच उत्तम इंग्रजी बोलत होते. निदान माझ्यापेक्षा तरी त्यांच इंग्रजी चांगलच होत. माझ कुतुहल जाग झाल. मी स्कुटर बाजुला घेतली व थांबलो. आणि त्यांच बोलण लक्ष देऊन ऎकायला लागलो. ते दोघ मृत्युबद्दल बोलत होते. त्यातल्या एकानी The Death या कवितेतल एक कडव म्हणल.
"Those that I fight, I do not hate...
Those that I guard I do not love..
A lonely impulse of delight
Drove to this tumult in the clouds"
थोड्यावेळापुर्वी मी याच हिजड्याकडे बघुन थुकलो होतो. माझीच मला लाज वाटली. मी त्यांच्या बाजुला गटाराजवळ बसुन त्याची चौकशी केली. आयुष्यात प्रथमच मी एका हिजड्याशी स्वतःहुन बोलत होतो. रस्त्यातले लोकं माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत होते. पण आता मला त्याची पर्वा नव्हती.
हा हिजडा मद्रास युनिव्हर्सिटितुन इंग्रजीत MA झालेला होता. त्याच इंग्रजी आमच्या कॉलेजच्या प्रोफ़ेसर इतक व शाळेच्या इंग्रजीच्या बाईंपेक्षा कितीतरी चांगल होत. पण त्याला कोणीच नोकरी द्यायला तयार नव्हत.
माझ्याशी बोलताना तो सहजपणे म्हणाला
I was taught in school, that "we are masters of our own destiny". But life taught me that, we are bound by it. Sir, what you see now is my destiny and I must accept it.
हे ऎकल्यावर माझ्या पोटात कस तरी झाल.
पवई भागात हा हिजडा दिसायचा. जाता येता मी मुद्दम थांबुन त्याच्याशी बोलायचो. त्याला तेव्हढ्यानीसुद्धा बर वाटायच. त्याला पेपर वाटायच काम दिल. लोकांना हा हिजडा सकाळी सकाळी घरी आलेला नको आहे. त्यानी स्टेशनरीच्या वस्तु गाडीत विकायचा व्यवसाय केला. पण त्याच्याकडून लोक या वस्तु विकत घ्यायला तयार नसायचे व इतर हिजड्यांनी त्याला हे विकताना पाहिल तर ते याला खुप शिव्या द्यायचे. कारण समाजानी हिजड्यांना जगण्यासाठी दोनच पर्याय समोर ठेवलेत एकतर स्वतःच शरिर घाण करायच आणि ऎडस् पसरवायचा वा टाळ्या वाजवुन, शिव्या शाप देऊन भिक मिळवायची. तिसरा पर्याय नाही. तो हिजडा नंतर परत मद्रासला गेला.
एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही. त्यांना जर शरिरविक्रय करायचा नसेल, भिक मागायची नसेल, तर एकमेव मार्ग उरतो व तो म्हणजे गुन्हेगारी वा गुन्हेगारांना मदत करणं. खर तर या लोकांच योग्य पद्दतीनी पुर्नवसन नाही केल तर ते आपल्या सर्वांसाठी फ़ार धोक्याच आहे.
समलिंगी व्यक्तिंची तर आणाखिनच कुचंबणा असते. ही माणस सर्व दृष्टीनी तुमच्या माझ्या सारखीच असतात. फ़क्त त्यांचा सेक्स चॉईस वेगळा असतो. त्यांना ते ज्या लिंगाचे असतात त्याच लिंगाच्या व्यक्तिबाबत आकर्षण असत. आणि हे इतक नैसर्गिक असत की त्याबाबत काहीच इलाज नसतो. ही मानसिक विकृती नाही वा कोणताच आजार नाही. पण या लोकांना इतकी वाईट वागणुक दिली जाते. जर्मनीत नाझींनी तर या वागणूकीत सैतानाला लाज वाटेल अशी कृत्य केलेली आहेत. आपल्या समाजात या लोकांची खुप टिंगल टवाळी केली जाते. त्यांना जगण मुश्किल केल जात. यात काही निरपराध आत्महत्या करतात. तर काही हे अपमानीत जिवन स्विकारुन मृत्युची वाट पाहात बसतात.
आज समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे. आपल यावर काय मत आहे ?