Showing posts with label पाऊस. Show all posts
Showing posts with label पाऊस. Show all posts

Wednesday, August 4, 2010

पाऊस

मस्त पाऊस पडत आहे ....आणि मग अर्थातच डोक्यात पहिला विचार येतो कि मस्त चहा आणि भजी हाणावे आणि असेच लोळत पडून राहावे आजीच्या साडीच्या धुपाटे घेऊन .. पण अचानक लक्षात येते कि चहा आणि भजी करायला आई नाही आहे खायचेच असेल स्वतः उठून करावे लागणार आहे.. आणि मग पडून राहायचे तर लक्षात येते कि ते आजीवाले धुपाटे पण नाही आहे.. आपण कितीतरी हजारो मैल दूर आहोत यासगळ्या पासून... आणि अचानक तो मस्त वाटणारा पाऊस .. रडायला लागलाय कि काय असे वाटायला लागते .. आणि मग काय सगळे परत विचार चक्र सुरु होते कि आपण उच्चशिक्षण का घेतो तर प्रगती करण्यासाठी... आपल्या आई बाबांना खुश ठेवण्य्साठी.. आणि अर्थातच स्वतः पाहिलेली काही स्वप्न पूर्ण करण्यसाठी.. आणि मग थोड्या वर्षाने लक्षात यायला लागते.. सगळी स्वप्न तर डोळ्यासमोर होती.. मग आपण का आलो ते सगळे जग सोडून.. आणि नक्की काय मिळवले हे स्वप्न पूर्ण करून.. फक्त पैसे जास्त कमावणार .. पण खरच ते स्वप्न होते का कधी.. ?? तर नाही.. मस्त आई बाबांना समाधान द्यायचे होते.. किंवा त्यांच्या डोळ्यात ते बघायचे होते.. आणि मग आयुष्यभर त्यांनी सभाळले तसे त्यांना सभालता यावे एवढेच तर समर्थ व्हायचे होते.. मग या कमीत कमी मागण्या पेक्षा माझी स्वप्न मोठी होत गेली कळलेच नाही.. आणि मग मी माझ्यात चक्रात अडकले नाही का ? आणि आता परत फिरणे नाही.. जे ठरवून आले होते ते पूर्ण करावेच लागणार आहे.. आणि अचानक जाणीव झाली कि हे अदृश्य बंधने कधी आली माझ्यावर... जबाबदारी कधी पडली खाद्यावर.. सगळे कसे नकळत घडून गेले.. आणि मग जाणीव झाली कि मी आत मोठी झाली.. कॉलेज मध्ये असताना आई माझी कधी पाऊसात भिजायला नाही आली.. मी सारखे म्हणायचे तिला कि ये तर खर.. तुला काही मजा नाही करायला येत बघ.. पण आता ज्यावेळी मी भिजण्यापुर्वी आजारी पडण्याचा किंवा आजारी पडले तर डॉक्टर च्या बिलाची काळजी करते त्यावेळी माझी मी च मला किती मिस करते कसे सांगू.. ??? वयानुसार मी बदलणार .. परिस्तिथी बदलणार याची जाणीव न्हवती असे कधीच न्हवते.. ते कायमच माहित होते.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ते होतच राहणार .. ते कोणी चुकवू नाही शकत.. पण स्वतः लाच आरशात बघताना वाटते कि मी काय विचार करायचे आणि आता काय करायला लागले होते.. ज्यावेळी आई असाच विचार करायची त्यावेळी स्वतःला लाखवेळा बजावले होते कि काही झाले तरी स्वतः ला असे होऊ द्यायचे नाही.. पण माझ्याच नकळत मी कधी अशी झाले कळलेच नाही.. फक्त आनंद , निखळ क्षण सगळे सगळे मागे पडले.. राहिला फक्त नोकरी पैसा जबाबदारी .. चूक बरोबर गोष्टींचा हिशोब... आणि व्यवहार .. !