Sunday, December 9, 2012

प्रारब्ध

सकाळच्या वेळी चहा पिता पिता दिवसभरचे प्लान्स करत होतो. तेव्हढ्यात बेल वाजली. शेजारच्या नवलेकाकु आत आल्या...
"बातमी कळली का?"
"कसली बातमी"
"अरे ते चौथ्या मजल्यावरचे जोशीकाका वारलेत ना सकाळी सात वाजता"
"अच्छा" अच्छा हा उद्गगारवाचक शब्द कुठेही मुर्खासारखा वापरतो आणि मग ओशाळल्यासारखे होते.

तशी आमची बिल्डिंग नवीनच होती आणि सगळी नवीन कुटुंबच होती त्यामुळे एकमेकांशी फ़ारशी ओळख नव्हतीच. आम्ही तर दिवसभर ऑफ़िसमधे चकाट्या पिटणारी लोकं आम्हाला तर नावावरुन चेहरा लक्षात येण्याची शक्यताच नव्हती. जोशीकाकांना कधी पाहिले असावे का असा विचार मी करुन लागलो. पण काही चेहरा लक्षात येत नव्हताच.

"काय झालं होतं त्यांना? आजारी वगैरे होते का?"
"नाही रे...सकाळी पाच वाजता रोज मॉर्निंग वॉकला जायचे. आजही गेले होते. तसं काही फ़ारसं वय नव्हतं. सत्तर-बहात्तर वर्षाचे..धडधाकट होते. चार मजले चढुन घरी आले. घरी आल्यावर दरदरुन घाम फ़ुटला त्यांना. अस्वस्थ वाटायला लागलं...श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. घरी मुलगा-सुन दोघंही झोपली होती. त्यांना उठवलं. मुलाने त्याच्या इनोव्हा मधुन तात्काळ त्यांना हॉस्पिटल मधे नेले. पण काही उपयोग नाही झाला. त्यांना तिथे गेल्यावर एक सिव्हियर हार्ट अ‍ॅटॅक आला आणि काही वेळातच त्यांनी प्राण सोडले."

घटनेच्या एक-दिड तासातच काकुंनी बरीच माहिती जमवली होती. अशा वेळा काय करायचं ते मला सुचत नव्हतं. मी म्हटलं
"मग अजुन डेड-बॉडी हॉस्पिटलमधेच आहे की घरी आणली?"
"अजुन हॉस्पिटलमधेच आहेत. त्यांच्या मुलाचा फ़ोन आला होता...त्यांच्या सुनेला आमचे हे हॉस्पिटलमधे घेऊन गेलेत. त्यांच्याकडुन माहिती मिळाली."
"अच्छा" पुन्हा अच्छा...मला स्वत:ची चीड येते कधी कधी.
"अरे...शेजारधर्म म्हणुन मदतीला जायला पाहिजे. तु आमच्या ह्यांना फ़ोन करुन विचार आणि काही मदत हवी असल्यास बघ."
"बरं. मी फ़ोन करतो"
मी नवलेकाकांना फ़ोन केला. काय परिस्थिती आहे त्यांना विचारले. ते म्हणाले तासाभरात सगळे सोपस्कार पुर्ण होतील आणि बॉडी ताब्यात मिळेल. जोशींच्या मुलाने सगळ्या नातेवाईकांना फ़ोन केलेला आहे. त्यांचे नातेवाईक सगळे आसपासचेच असतील. घरी पोहोचलेच असतील एव्हाना. पण घराला कुलप आहे. त्यामुळे त्यांना तुझ्या घरी बसवुन ठेव.

मी खाली चौथ्या मजल्यावर गेलो. तिथे दरवाज्यावरच उभा राहिलो. जो येईल त्याला माझ्या घरी पाठवत होतो. दिड तास मी तिथेच उभा होतो. जवळपास तीस चाळीस नातलग पोहोचले होते. माझं घर तसं ऐसपैस होतं..मी एकटाच राहणारा...घरात काही फ़ारसं सामान नाही. त्यामुळे सतरंजी अंथरुन आरामात सगळ्यांच्या बसायची सोय झाली होती. शेवटी त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाने मला घरी जायला सांगितलं आणि तो दरवाजावर उभा राहिला.

दहा वाजुन गेले होते. मी ऑफ़िसला फ़ोन करुन दुपारी उशिरा येईल असं कळवलं. आणि जमलेल्यांना काय हवं नको ते पहायला लागलो. मंडळी गप्पा मारत बसली होती. काहीकाही गोष्टी कानावर येत होत्या. जोशीकाका बऱ्यापैकी विद्वान असले पाहिजेत याची कल्पना मंडळींच्या गप्पावरुन येत होती. मी चुपचाप ऐकत होतो. त्यातला एकही माणुस माझा परिचयातला नव्हता. पण आज ते सगळे माझ्या घरी होते. हे माझ्या वास्तुचे प्रारब्ध असावे किंवा आणखी काही. अशा अनेक घटना आयुष्यात अनपेक्षित असतात. आणि त्यांना सामोरे जात रहाणे एव्हढेच आपल्या हाती असते. सकाळी दिवसभराचे जे काही प्लान्स केले होते ते सगळे वाया गेले होते. पण त्याबद्दल चरफ़ड होत नव्हती कारण अशा प्रसंगी मदतीला उभे राहिलो नसतो तर ते मनाला कायम बोचत राहिलं असतं. जोशीकाकांच्या मुला्शी कधीही नजर मिळवु शकलो नसतो. संपुर्ण दिवस मी अगदी मनापासुन जे शक्य असेल ती मदत करत होतो. त्यांच्यातलाच एक झालो होतो. पुढले तेरा दिवस माझे घर त्यांच्या पाहुणेमंडळींसाठी खुलं होतं. तेराव्याच्या जेवणाच्या पंक्तीही माझ्याच घरी उठल्या.

ह्या तेरा दिवसात कुणाल, जोशीकाकांचा मुलगा, माझ्या चांगल्याच परिचयाचा झाला. त्याला आधीही बऱ्याचदा पाहिलं होतं, पण ओळख अशी नव्हती. कुणाल आणि त्याची बायको अस्मिता एकत्रच ऑफ़िसला जायचे सकाळी. माझा ऑफ़िसचा टाईमही जवळपास तोच होता, त्यामुळे पार्किंगमधे नेहेमीच भेट व्हायची. हळुहळु परिचयातुन खुप चांगली मैत्री झाली. खुपच प्रेमळ कुटुंब होतं ते. आपुलकीने चौकशी करायचे ते माझी. माझ्यापेक्षा तीनचार वर्षाने दोघंही मोठी होती, करिअरमधे वेल-सेटल्ड होती.

मीही नोकरीत चाललो होतो. कर्जावर का असेना स्वत:च थ्री-बेडरुमचं घर घेतलं होतं. स्वत:ची ह्युंडाई सॅंट्रो होती. आई-वडील गावाकडुन कधीमधी चक्कर टाकायचे. दहा-पंधरा दिवस रहायचे. एकुलता एकच होतो. पण शेतीवाडी बघायची असल्याने आई-बाबा गावीच राहत. अजुन पन्नाशीतच होते ते. प्रकृतीही अगदी ठणठणीत. पण जोशीकाका गेल्यापासुन एक अनामिक काळजी मला आई-बाबांबद्दल वाटायला लागली. गावाकडुन अवेळी फ़ोन आला की छातीत धस्स व्हायचं. शेती दुसऱ्याला कसायला देऊन आई-बाबांना पुण्याला माझ्याजवळ कायमचे बोलावुन घ्यायचा विचार मी करायला लागलो. पण बाबा ऐकणाऱ्यातले नव्हतेच. तरी मी प्रयत्न चालुच ठेवला. दर दोन दिवसांनी मी त्यांना शहरात येऊन आराम करा असा सल्ला द्यायचो. तर त्यावर ते तुमच्या पुण्याला कसला आलाय आराम...शुद्ध हवा तरी मिळते का तिथे म्हणुन उलट प्रश्न करायचे.

एकदा कुणालने संध्याकाळी चहाला बोलावलं. मी गेलो. आणि गप्पा मारता जोशीकाकांचा विषय निघाला. त्यादिवशी मंडळी काकांबद्दल जे काही बोलत होती त्याचाच धागा घेऊन मी जोशीकाकांबद्दल सहज माहिती विचारु लागलो. असं कळलं की भौतिकशास्त्राचे विद्वान म्हणुन त्यांची ख्याती होती. पण गेले तीस वर्ष ते विज्ञानकथा लिहित असत. त्या सगळ्या कथा मुलाकडे पडुन होत्या. कधी प्रकाशित कराव्यात असं त्यांनाही वाटलं नाही. मला विज्ञानकथांची आवड होती. त्यामुळे ती हस्तलिखिते मी वाचायला मागुन घेतली. अगदी चार-पाच पानांच्या कथा होत्या पण अचंबित करणाऱ्या वैज्ञानिक संकल्पनांची सांगड धार्मिक संकल्पनांशी घालुन कल्पनाविलासाच्या जोरावर इतक्या सुंदर कथा लिहिल्या होत्या की मी एका दमात सगळं हस्तलिखित वाचुन काढलं. काकांच्या प्रतिभाशक्तीने अगदी भारावुन गेलो होतो, त्यापेक्षाही अधिक अचंबा मला याचा होता की ह्या कथा आजवर प्रकाशित कशा नाही झाल्या. मराठी साहित्याचा मैलाचा दगड म्हणुन ह्या कथा गाजतील ह्याची मला खात्री होती. मी कुणालकडे गेलो आणि त्याला विचारलं.
"तु वाचल्या आहेत ह्या कथा?"
"अर्थात. बाबा सगळ्यात आधी मला द्यायचे वाचायला"
"अरे मग तुला कधी वाटलं नाही ह्या प्रकाशित कराव्याशा"
"वाटायचं रे. लहानपणी वाटायचं की माझ्या बाबांचीही पुस्तकं असावीत, मी त्यांच्या खुप मागे लागायचो. सुरुवातीला ते माझ्या प्रश्नांना बगल द्यायचे. पण पुढे मी मोठा झाल्यावर एकदा ह्याबद्दल ते माझ्याशी बोलले. ते म्हणाले की ह्या कथांमधे काही दम नाही. त्या वैज्ञानिक कथाही नाहीत. नुसत्याच चमत्कृतीपुर्ण आहेत. खरंतर बाळबोध आहेत. ज्यांना विज्ञान आणि अध्यात्म खरंच कळतं तेच ह्यांच खरं मुल्यमापन करु शकतील."
"मग?"
"मी विचारलं मग त्यांना...की असं आहे तर तुम्ही लिहिलंच का हे सगळं? तर ते म्हणाले की मनातल्या चुकीच्या संकल्पना पुसुन टाकण्यासाठी. एकदा कागदावर उतरवुन चार-पाच वेळा त्या वाचल्या की त्यातला मुर्खपणा कळायला लागतो. मनात राहिल्या तर त्याच भावविश्वात रमून जायला होतं. त्यांच्यापासुन सुटका होत नाही आणि अभ्यासातील तटस्थता संपते. भौतिकशास्त्रात एका निरपेक्षदृष्टीने अभ्यास करायचा असतो."
"अच्छा"
"मला फ़ारसं काही पटलं नाही त्यांच मत, पण त्या क्षेत्रातले ते जाणकार होते. आणि त्यामुळे त्यांच्यापुढे ह्या विषयावर मी पुढे कधी बोललोच नाही."
"हम्मम..अरे पण मीही भौतिकशास्त्रामधेच संशोधन करतोय. मला विषय कळतो बऱ्यापैकी. मी खात्रीने सांगु शकतो. ह्या कथा बाळबोध नाहीत."
"मलाही जाणवतं रे ते..पण बाबांची इच्छा होती..म्हणुन मी त्या कथा आता प्रकाशित करणार नाही"
"प्रकाशित केल्यास तर मराठी साहित्यावर फ़ार उपकार होतील तुझे"
"जाऊ दे रे...काय उपकार वगैरे घेऊन बसलायेस...मी ह्या विषयावर विचार करणेच बंद केलेय. प्लिज मला ह्यात पुन्हा गुंतवू नकोस"

बरं.. असं म्हणुन मीही पुढे त्याच्याशी त्यावर चर्चा केली नाही. पण त्या कथा माझ्या डोक्यात सतत गोंधळ निर्माण करत असत. भौतिकशास्त्रीय दृष्ट्या त्यात चुकीचं असं काहीही वाटत नव्हतं. मग जोशीकाकांनी कुणालला असं का सांगितलं असावं ह्याचा विचार मी करत असे. भौतिकातुन आध्यात्माकडे त्यांच्या कथा इतक्या बेमालूमपणे जात असंत वाचणाऱ्याला त्या विज्ञानकथा आहेत ह्याचा विसर पडावा. त्यांच्या प्रत्येक कथेत एक साम्य मात्र होतं. सापेक्षतावादाच्या जनरल थिअरीत ज्याप्रमाणे काळ-अवकाश-वस्तुमान ह्यांची सांगड घालुन गुरुत्वाकर्षणाचा उगम सिद्ध केला आहे त्या नियमाचा आधार प्रत्येक ठिकाणी होत असे. समजा तुम्ही एक जाळी जमीनीपासुन काही अंतरावर, पण जमीनीला समांतर अशी बांधली चारही कोपऱ्यांना. त्या जाळीवर काही वस्तु ठेवली..तर ती वस्तु त्या जाळीला वाकवते. तसेच  दोन वस्तुमान असलेल्या वस्तु काळ-अवकाशाच्या जाळीदार वस्त्रावर ठेवल्यास त्या वस्तुंच्या वस्तुमानाने् ती जाळी खाली वाकेल आणि त्यातुन त्या वस्तु घरंळुन एकमेकांजवळ यायचा प्रयत्न करतील आणि ह्यालाच गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. मनुष्याच्या इंद्रियांच्या मर्यादा काळ ही मिती पाहुच शकत नाही. अवकाश त्याला समजते. पण काळ समजत नाही. त्यामुळे काळ-अवकाशाची जाळी त्याला दिसत नाही. आध्यात्मिक शक्तींच्या जोरावर मात्र तो स्वत:च्या शरीरापासुन स्वत:ला दुर घेऊन जाऊ शकतो आणि निरपेक्षरित्या विश्व पाहु शकतो असा त्यांच्या कथांचा सूर असायचा.

पण जगात निरपेक्ष असं काहीच नसतं हेच तर आईनस्टाईनने सांगितलं होतं. कदाचित ह्यामुळेच जोशीकाकांना त्यांचे संशोधन चुकीचे वाटत असावे अशी समजुत मी करुन घेतली. पण मग ते दर वेळा त्याच सुत्रावर कथा का लिहित ह्याबद्दलचे कोडे मला उलगडत नव्हते. माणुस स्वत:ला त्याच्या शरीरापासुन दूर घेऊन कसा जाऊ शकत असावा ह्याबद्दल वाचु लागलो. Astral Projection म्हणजेच सुक्ष्मजीवाला स्वत:च्या शरीरापासुन दुर घेऊन जायची विद्या ह्यावर खुप माहीती मिळाली. अनेक भारतीय आध्यात्मिक गुरुंना astral projection करता येते हेही तेव्हाच कळलं.

एकदा सहज कुणालबरोबर गप्पा मारतांना कळाले की जोशीकाकांची आध्यात्मिक साधनाही जबरदस्त होती. सकाळी मॉर्निंग वॉकला ते जायचे एका टेकडीवर आणि तिथे रोज एक तास साधना करायचे. मी कुणालला विचारले
"आध्यात्मिक साधना करायचे म्हणजे नक्की काय करायचे ते?"
"मला नीटसं माहित नाही. पण मला वाटतं ध्यानधारणा वगैरे करत असतील."
"तु त्यांना कधी विचारलं नाहीस?"
"विचारलं..पण त्यांनी सांगितलं की तुला अजुन कळणार नाही अध्यात्म म्हणजे काय ते. मलाही फ़ारसा कधी इंटरेस्ट नव्हताच त्यात"
"अच्छा...त्यांचा कोणी गुरु होता?"
"होता ना...म्हणजे आहे ना..पुण्यातच असतात ते. त्यांचे नाव अरविंद अत्रेय. बरंच वय आहे त्यांच आता. नव्वदी पार केली असावी त्यांनी. त्यांचा आश्रम आहे सिंहगडाच्या पायथ्याशी. बाबा आम्हाला नेहेमीच त्या आश्रमात घेऊन जायचे. इतकं शांत आणि छान वातावरण असायचं तिथे. मन अगदी प्रसन्न होऊन जायचं.  बरेच दिवस झालेत तिथे जाऊन. जाऊया आपण तिथे कधी"
"नक्कीच..तु जाशील तेव्हा मला नक्की बोलव."

पुढच्याच आठवड्यात तिथे जायचा योग आला. अरविंद बाबांना मी भेटलो. इतकं तेजस्वी व्यक्तिमत्व होतं त्यांच. त्याच तेजाबरोबर एक प्रकारची शांती त्यांच्या चेहऱ्यावर होती. त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली. मी देखील भौतिकशास्त्रात संशोधन करतोय म्हटल्यावर त्यांना जोशीकाकांची आठवण झाली.
"प्रा. जोशी देखील भौतिकशास्त्रात संशोधन करीत, नेहेमी मला अनेक प्रश्न विचारीत. कधी मी त्यांची समाधानकारक उत्तरं देऊ शकलो का हे मला अजुनही कळालेलं नाही"
"आम्ही भौतिकशास्त्राचे अभ्यासक मुळातच अश्रद्ध असतो. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आम्हाला एका थिअरीत बसवायचे असते.  एकतर ती थिअरी चुकीची आहे हे सिद्ध करा नाहीतर आम्हाला समाधानकारक उत्तर द्या असाच आमचा खाक्या असतो" मी गंमतीत म्हणालो.
"पण थिअरी चुकीची आहे की बरोबर ह्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं? आम्ही आध्यात्माचा अभ्यास करतो. मन:शक्तीच्या जोरावर आत्म्याला शारिरिक बंधनांपासुन-लालसांपासुन दुर ठेवणे..त्याची सुचिर्भुतता कायम ठेवणे हेच आमचे काम."  बाबा बोलले.
"थिअरी बरोबर की चुक हे खुप महत्वाचं आहे बाबा. आज इतकी शास्त्रीय प्रगती झाली त्याच्या मुळाशी ह्या थिअरीज आहेत"
"शास्त्रीय नाही..भौतिक प्रगती म्हणा. शास्त्रीय प्रगती हा खुप मोठा शब्द आहे. शास्त्र नक्की काय आहे ह्याचा अजुन उलगडा व्हायचाय"
"म्हणजे?"
"बघा ही सृष्टी काही नियमांनी बांधील आहे असा तुमच्या वैज्ञानिकांचा समज आहे. त्यालाच तुम्ही शास्त्र म्हणतात. पण ते नियम म्हणजे शास्त्र नाही. मुळात नियम अस्तित्वात असणं गरजेचे आहे का? काही काही गोष्टींमधे नियम असतीलही. पण खरंतर ते नियम नसुन पॅटर्नस आहेत. बघा विशाल महासागरात लाटांचे काही काही पॅटर्नस दिसुन येतात. पण ते पॅटर्न्स संपुर्ण महासागराचे नियम नाहीत.  महासागराची उत्पत्ती, त्याची शांतता, त्याच्यातील जीवसृष्टी, त्यातील विवरं अशा असंख्य आस्पेक्ट्स असतात महासागराकडे बघण्याच्या. विश्वाचंही तसंच आहे. त्याच्या दृश्य वास्तवांचे नियम शोधत असतात तुम्ही मंडळी"
"मग आध्यात्मिक मंडळी काय करतात?" खरंतर थोडा उद्धट प्रतिप्रश्न होता माझा.
"आम्ही फ़क्त ह्या विश्वाला निरपेक्षपणे बघायचं काम करतो. सागरात राहुन तुम्हाला सागर किती मोठा आहे हे कळत नाही.  त्यासाठी तुम्हाला अवकाशातुन त्याचा पसारा पहावा लागतो. तसंच हे आहे. विश्व काय आहे हे बघणे विश्वात राहुन शक्य नाही. आईनस्टाईनचे बरोबर आहे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने. तुम्ही ह्या विश्वात राहुन निरपेक्षपणे काहीही अनुभवु शकणार नाही. आणि जोवर ह्या विश्वाचं कोडं उलगडत नाही तोवर मानवी मनाला शांतता लाभणं शक्य नाही. मानवी मन ह्याच भौतिक शरीरात तोवर अडकलेलं राहिल. शरीराच्या वासना आत्म्याला चिकटुन राहतील आणि आत्मा शरीरापासुन विलग व्हायला धजावणार नाही."
"आत्म्याचं इतकं महत्व काय आहे? आत्मा ही संकल्पना तरी खरी आहे का?"
"आत्मा ही संकल्पना नाही. ते सत्य आहे. आत्मा हा परमात्म्याचाच छोटासा अंश..परमात्म्याने जेव्हा ह्या विश्वाची निर्मीती केली तेव्हा परमात्याचे काही अंश ह्या विश्वात अडकले आणि त्याचा संयोग जेव्हा विश्वातील कणांशी झाला तेव्हाच जीवसृष्टी निर्माण झाली. ह्या आत्म्याचं तसं ह्या विश्वात काहीही कार्य नाही. त्याचा मुळ उद्देश ह्या विश्वातुन मुक्तता करुन घ्यायचं आणि परमात्म्यात विलीन होऊन जायचं. त्यालाच निर्वाण असं म्हणतात"
"पण ही सुद्धा एक थिअरीच वाटते. ह्याला आधार काहीही नाही"
"बरोबर आहे. ही एक थिअरीच आहे. अशा अनेक थिअऱ्या आहेत. आम्ही आध्यात्मिक जगात ह्यांचाच विचार करत असतो. तेच आमचे क्षेत्र आहे. आम्ही प्रयोग करतो आणि बघतो की थिअरी योग्य आहे की नाही ते."
"प्रयोगाचे उदाहरण म्हणजे astral projection?" मी विचारले
"हो..तोही एक प्रयोगच आहे." बाबा म्हणाले. "जोशी देखील मला ह्याबद्दल खुप विचारायचे"
"अच्छा." मी बाबांच्या एकुणच ज्ञानाने प्रभावित झालो होतो. "मला सांगा हे astral projection करणं तुम्हाला शक्य आहे?"
"हो. मला ते करता येतं. त्यासाठी खुप साधना लागते. एक त्रयस्थपणा अंगी बाणवावा लागतो. स्वत:च्या कुठल्याही गोष्टीत जीव अडकवायचा नाही. त्राटकसाधना करायची. शरीराचं आज्ञाचक्र विकसित करायचं. आपलं अस्तित्वच आज्ञाचक्रात मिसळुन टाकायचं. मग सोपं होतं शरीरापासुन दुर व्हायला"
"पण मग पुन्हा शरीरात कसं येतात तुम्ही?"
"एकदा आपला सुक्ष्मजीव शरीराच्या बाहेर गेला की खऱ्या सृष्टीचं दर्शन होतं. तिथे इंद्रियांच्या मर्यादा आड येत नाहीत. अर्थात माझ्यासारखे लोकं त्या अवस्थेत भौतिक नियमांचा अभ्यास करत नाहीत. आम्हाला त्याबद्दल फ़ारशी माहीतीही नसते आणि त्यामधे काही रसही नसतो. आम्ही आपले परमात्म्याच्या शोधात असतो. पण हे विश्व इतकं विशाल आहे की त्यात हरवुन जायला होतं आणि शेवटी शरीराची आठवणच आपल्याला परत घेऊन येते"
"म्हणजे शरीराशी attachment हवीच, अन्यथा तुम्ही ह्या विश्वातच भटकत रहाल"
"बरोबर"
"पण मग ते विश्वात भटकत राहणे काय वाईट?"

"हे विश्व एक मायाजाल आहे. तिथे भटकणं म्हणजे भरकटण. मानवी शरीरात येण्यापुर्णी आत्मा असाच भरकटत असतो. मानवी शरीराकडे मनाची शक्तीही असते. मानवी शरीर ही विश्वातील सर्वात प्रगत निर्मीती आहे. आत्म्याला ह्याच शक्तीचा उपयोग परमात्म्याशी मिलन करण्यास करुन घ्यायचा असतो. दुर्दैवाने ते तसे नेहेमीच होत नाही. बऱ्याचदा आत्मा शारिरिक - भौतिक गोष्टींमधेच अडकतो."

"पण ह्या गोष्टी इतक्या खात्रीशीररित्या कशा सांगु शकतात तुम्ही? हे ज्ञान तुम्हाला मिळाले कुठुन..ते बरोबर की चुक ह्याची खात्री कशी करुन घेतली तुम्ही?"

"तुम्ही मला सांगा..लहानपणी तुम्ही भौतिकशास्त्र शिकायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला खात्री होती का की तुम्ही जे शिकत आहात ते बरोबर आहे? तुम्ही त्यावर विश्वास ठेऊ लागलात. आणि आज तुम्ही इतक्या वरच्या पातळीवर पोहोचला आहात की तुम्ही त्यावर संशोधन करुन त्यातील थिअरीज बरोबर आहेत की चुकीच्या ह्या पडताळुन पाहतात. तसंच आमचंही आहे. आम्ही आता संशोधक बनलोत..आधी विद्यार्थी होतो.." बाबा म्हणाले.

माझ्या प्रत्येक प्रश्नाचं बाबांकडे उत्तर होतं. मलाही काहीसं पटत होतं त्यांच म्हणणं. ते त्यांच क्षेत्र होतं आणि त्यात एका निष्टेने त्यांनी वाहुन घेतलं होतं.  पण त्यांच्या ह्या बोलण्याने माझ्या मनात जोशीकाकांबद्दल विचार घोंघावु लागले.

"जोशीकाकांबद्दल तुम्ही काही सांगत होतात की तेही तुम्हाला ह्याबद्दल प्रश्न विचारायचे."
"हो.  जोशीही astral projection ची साधना करत होते. पण त्यांना कधी यश आले नाही. निदान तसे झालेले मला तरी माहित नाही"
"त्यांचा मृत्यु तसा अचानकच झाला. ते सकाळच्या साधनेतुन परतले आणि त्यांना ह्र्दयविकाराचा झटका आला."
"हो मला ही बातमी खुप नंतर मिळाली. त्यांचा मृत्यु झाला तेव्हा मी astral projection करत होतो. माझा सुक्ष्मजीव नव्हता जागेवर. माझं जोशींशी दोनच दिवसांपुर्वी बोलणं झालं होतं ह्याबद्दल"
"अच्छा"

मला बऱ्याच गोष्टी त्यादिवशी नव्याने समजल्या होत्या. एक प्रकारचं समाधान मनामधे भरुन होतं. मीही जोशीकाकांप्रमाणेच astral projection वर संशोधन करावसं मला वाटु लागलं. आणि मी त्यादृष्टीने तयारी करु लागलो. भारतभर फ़िरलो. अनेक योगींना भेटलो. खुप साधना केली. शेवटी एकेदिवशी त्याचं फ़ळ मिळालं. घरी मी साधना करत होतो. आणि आज्ञाचक्र उद्दिपित झालं. दोन्ही भुवयांच्या मधोमध एक तेजस्वी चक्र फ़िरतंय असं वाटु लागलं. त्याचं अस्तित्व अधिकच गडद होऊ लागलं आणि माझ अस्तित्व त्यात मिसळायला लागलं. हळहळु त्या चक्राने माझ्या शरीराबाहेर प्रवेश केला..आणि त्याबरोबर मीही बाहेर पडलो. एका विशाल विश्वाचे दर्शन मला होत होते. मी भारावुन गेलो होतो. प्रकाशाच्या वेगाने मी धावत होतो. एक भौतिक शास्त्रज्ञ म्हणुन अनेक गोष्टी मी टिपल्या. संपुर्ण विश्वातील ज्ञानातील भंडार आज माझ्यापुढे खुलं होतं. मी मनसोक्त भटकलो. पण शेवटी शरिराची ओढ कायम होती. मी परतायचं ठरवलं. माझं घरच मला सापडेना..पण शेवटी खुप प्रयत्नाने ते मला सापडलं. घरात प्रवेश करुन बघतो तर काय...माझ शरीर तिथे नव्हतं. तिथे नव्हतं तर ते कुठं होतं? मी खुप शोधायचा प्रयत्न केला. मला लोकं दिसत होती, पण त्यांच्याशी संवाद साधु शकत नव्हतो. शेवटी अरविंदा बाबांच्या आश्रमात जाऊन त्यांच्याशी काही संवाद होतो का ह्यासाठी गेलो. आश्रमात शिरताच पाहतो तर काय..तिथे माझं शरीर होतं. नुसतंच नव्हतं...तर जिवंत होतं. माझ्या शरीराभोवती एक प्रचंड तेज होतं आणि अरविंद बाबांनी माझ्या शरीराच्या पायाशी लोटांगण घातलं होतं. तो संवाद मी कधीही विसरु शकणार नाही.
"माफ़ करा मला.." अरविंद बाबा म्हणत होते.
"धोका दिलास तु मला..." माझ्या शरीरातुन तीक्ष्ण बाणाप्रमाणे शब्द बाहेर निघत होते.
"मला जीवनाची तीव्र आसक्ती होती. मृत्युची कल्पनाच मला सहन होत नव्हती. म्हणुन मृत्यु होताच मी तुमच्या देहात प्रवेश केला..मला माफ़ करा बाबा" अरविंद बाबा असं काय म्हणत  आहेत हे मला कळतच नव्हतं.
"तुम्हाला प्रायश्चित ईश्वरच देईल जोशी" माझा देह वदला.. आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरविंद बाबांच्या देहात जोशीकाकांनी प्रवेश केला होता आणि माझ्या देहात अरविंद बाबांनी. मी हबकलो.
तेव्हढ्यात माझ्याकडे पाहत माझा देह म्हणाला. "तुम्ही घाबरु नका..मी तुमच्या देहात फ़ार काळ राहणार नाही...माझे जीवन तसेही फ़ारसे उरले नव्हते. जोशींनी माझ्या देहात प्रवेश करुन फ़ार आयुष्य मिळवले अशातला भाग नाही. पण आज त्यांनी तुमच्या देहात प्रवेश करायचा प्रयत्न केला जो मी हाणुन पाडला...म्हणुनच मला तुमच्या शरीरात यावं लागलं अन्यथा जोशींसारख्या लोभी आत्म्याने ते बळकावलं असतं."
"पण मग आता काय?"
"आता माझ्यासाठी तरी काही पर्याय नाही...तुमच्या शरीरात राहुन मी astral projection जोवर पुन्हा शिकत नाही तोवर मी बाहेर येऊ शकणार नाही. तोवर तुम्ही अवतीभोवतीच रहा..माझ्या आध्यात्मिक बळाने मी तुमच्याशी संवाद साधु शकेलच"

तेव्हढ्यात पिस्तुलाच्या गोळ्या माझ्या शरीरातुन आरपार झाल्या. अरविंद बाबांच्या देहातील जोशींनी माझ्या देहावर गोळ्या झाडल्या होत्या. माझा देह निष्प्राण होऊन पडतांना मी स्वत: पाहिले..आणि पाहिला अरविंद बाबांचा आत्मा...हो तिथुन निघाला आणि माझ्यादेखत अनंताच्या प्रवासाला निघाला. देह उरला नव्हता..निदान अरविंद बाबांच्या मागे गेलो तर परमात्मा मिळेल म्हणुन त्यांचा पाठलाग सुरु केला. पण ते फ़ार पुढे निघुन गेले होते. मी ह्याच विश्वात अडकलो. आजही नुसता भटकतोच आहे. हे भरकटणंच माझं प्रारब्ध होतं हे आता मला कळतंय.  प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. अरविंद बाबांच्या देहातील जोशीकाकांनाही नाही चुकले. त्यांच्या देहाचा लवकरच मत्यु झाला आणि त्यांनाही परमात्मा लाभला नाही. तेही भटकत आहेत. पण त्यांनी केलेल्या चुका मला माहित आहेत. मी नक्की आयुष्यात असं काय केलं ज्याची मला सजा मिळतेय हे अजुनही मला उमगलेलं नाही.

Saturday, January 28, 2012

समाजाच प्रबोधन करण्याची गरज

आपल्या समाजात एकीकडे बर्‍याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.

आपल्या समाजात भ्रष्ट नेता, पैसे खाणारा अधिकारी, गुंडगीरी करणारा व स्त्रीयांवर बलात्कार करणारा  वा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.

वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही. मी या बाबतीत काही काम करतो म्हणल्यावर माझ्या अनेक मित्रांनी माझ्याशी संबंध तोडले. ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.

आपल्या सुशिक्षित समाजातसुद्धा ( अर्थात सुशिक्षित कोणाला म्हणायच हा प्रश्नच आहे ) हीच कल्पना आहे की, या प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते हे वेश्येकडे जात असलेच पाहिजेत. आपल्या समाजात कोणी नुसती कुजबुज केली, की अमका अमका माणूस वाईट आहे, त्याच्या चारित्र्याबाबत बोलल की लगेच ऎकणार्‍याला खर वाट्तं, पण एखादा माणूस खुप चांगला आहे अस म्हणल. तर "काय सांगाव, खर खोट त्या प्रमेश्वरालाच माहिती" असा लगेच रिमार्क येतो.

एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्‌ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देतोय. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे.  तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते. एखाद्या लग्न मोडलेल्या व्यक्तीबाबत वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. घटास्पोटित व्यक्तिंना अपमानीत वागणुक मिळते. एखाद्या मुलं न झालेल्या जोडप्याकडे समाज अशा नजरेनी बघतो की त्यांना मेल्याहुन मेल्यासारखं होतं. मला एक कार्यकर्ता माहीती आहे की ज्याच लग्न, तो HIV ची माहिती तरुण वर्गापर्यंत नेण्याच काम करतो, या एकाच कारणास्तव तीन वेळा मोडल आहे.

माझी एक विद्यार्थिनी आहे, ती एका वेश्येची मुलगी आहे. ही वेश्या हैद्राबादच्या खानदानी वेश्या कुटुंबातली आहे. (यात सुद्धा खानदानी हा प्रकार आहे बरं का ! ) त्यांचे संबंध पूर्वी राजे रजवाड्यांशीच असायचे, सध्या ते असतात मोठ्या उद्योगपतींशी. ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला. या मुलीच्या मागे मुलं नाही लागली तरच नवल. पण अनेकजण ती एक वेश्येची मुलगी आहे, तेव्हा तीची छेड काढायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे, असाच अर्थ घेतात व तीच छेड काढायचा प्रयत्न करतात. कॉलेजचे प्रोफ़ेसरसुद्धा यात मागे नाहीत. आज ही समाजाची विचारसरणी आहे.

वेश्यागृहातुन सोडवलेल्या बाईला व तीच्या मुलांना कामं मिळत नाहीत. चांगल शिक्षण मिळत नाही.

हिजड्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. आणि त्यामुळे यांच पुनर्वसन खुप कठिण जात. एक असा गैरसमज आहे की हिजड्याच तोंड पाहिल की दिवस खराब जातो, त्यांना जादू टोणा चांगल्यापैकी माहिती असतो. या समजांमुळे समाजानी यांना खुप दूर ठेवलेल आहे. त्यांच्या वस्त्या ह्या वेश्या वस्त्यांच्या जवळ असतात. काही वर्षांपूर्वीच हिजड्यांना कायद्यानी मान्यता देऊन त्यांची मतदार म्हणून नोंदवणी केलेली आहे. त्यांना रेशन कार्ड मिळालेली आहेत. पण तरी हे काम खुप कमी पडत. मी काही हिजडे हे खुप शिकलेले पाहिलेले आहेत. त्यांना शरिर विक्रय करायच नसत. भिकमागुन जगण नको असत. त्यांना आपल्यासारख काही चांगल काम करायच असत. मेहनतीनी पैसे मिळवुन खायच असत. आपेक्षा फ़ारच थोडी असते. पण ही माफ़क आपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग यांचा संबंध येतो तो वेश्या व गुन्हेगार यांच्याशी.


काही वर्षांपूर्वी  माझी समजुत अशीच होती की, हिजडे एकमेकांशी बोलताना अत्यंत घाण शिव्या, शाप देत, गलिच्छ अंगविक्षेप करत बोलतात.

एकदा मी मुंबईला स्कुटरनी जात होतो. स्कुटर सिग्नलपाशी थांबवली व मी सिग्नल मिळायची वाट बघत होतो. बाजुला गटाराच्या जवळ दोन हिजडे भिक मागुन मिळालेल खात होते. मला हिजड्यांचा प्रचंड राग होता व किळस वाटायची. मी त्या दोघांकडे तुच्छतेनी पाहिल आणि पचकन थुकलो.


या दोन हिजड्यांच बोलण मला ऎकायला येत होत. ते हिंदी बोलताना मधेच उत्तम इंग्रजी बोलत होते. निदान माझ्यापेक्षा तरी त्यांच इंग्रजी चांगलच होत. माझ कुतुहल जाग झाल. मी स्कुटर बाजुला घेतली व थांबलो. आणि त्यांच बोलण लक्ष देऊन ऎकायला लागलो. ते दोघ मृत्युबद्दल बोलत होते. त्यातल्या एकानी The Death या कवितेतल एक कडव म्हणल.

"Those that I fight, I do not hate...
Those that I guard I do not love..
A lonely impulse of delight
Drove to this tumult in the clouds"

थोड्यावेळापुर्वी मी याच हिजड्याकडे बघुन थुकलो होतो. माझीच मला लाज वाटली. मी त्यांच्या बाजुला गटाराजवळ बसुन त्याची चौकशी केली. आयुष्यात प्रथमच मी एका हिजड्याशी स्वतःहुन बोलत होतो. रस्त्यातले लोकं माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत होते. पण आता मला त्याची पर्वा नव्हती.

हा हिजडा मद्रास युनिव्हर्सिटितुन इंग्रजीत MA झालेला होता. त्याच इंग्रजी आमच्या कॉलेजच्या प्रोफ़ेसर इतक व शाळेच्या इंग्रजीच्या बाईंपेक्षा कितीतरी चांगल होत. पण त्याला कोणीच नोकरी द्यायला तयार नव्हत.

माझ्याशी बोलताना तो सहजपणे म्हणाला
I was taught in school,  that "we are masters of our own destiny". But life taught me that, we are bound by it. Sir,  what you see now is my destiny and I must accept it.

हे ऎकल्यावर माझ्या पोटात कस तरी झाल.

पवई भागात हा हिजडा दिसायचा. जाता येता मी मुद्दम थांबुन त्याच्याशी बोलायचो. त्याला तेव्हढ्यानीसुद्धा बर वाटायच. त्याला पेपर वाटायच काम दिल. लोकांना हा हिजडा सकाळी सकाळी घरी आलेला नको आहे. त्यानी स्टेशनरीच्या वस्तु गाडीत विकायचा व्यवसाय केला. पण त्याच्याकडून लोक या वस्तु विकत घ्यायला तयार नसायचे व इतर हिजड्यांनी त्याला हे विकताना पाहिल तर ते याला खुप शिव्या द्यायचे. कारण समाजानी हिजड्यांना जगण्यासाठी दोनच पर्याय समोर ठेवलेत एकतर स्वतःच शरिर घाण करायच आणि ऎडस्‌ पसरवायचा वा टाळ्या वाजवुन, शिव्या शाप देऊन भिक मिळवायची. तिसरा पर्याय नाही. तो हिजडा नंतर परत मद्रासला गेला.

एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही. त्यांना जर शरिरविक्रय करायचा नसेल, भिक मागायची नसेल, तर एकमेव मार्ग उरतो व तो म्हणजे गुन्हेगारी वा गुन्हेगारांना मदत करणं. खर तर या लोकांच योग्य पद्दतीनी पुर्नवसन नाही केल तर ते आपल्या सर्वांसाठी फ़ार धोक्याच आहे.

समलिंगी व्यक्तिंची तर आणाखिनच कुचंबणा असते. ही माणस सर्व दृष्टीनी तुमच्या माझ्या सारखीच असतात. फ़क्त त्यांचा सेक्स चॉईस वेगळा असतो. त्यांना ते ज्या लिंगाचे असतात त्याच लिंगाच्या व्यक्तिबाबत आकर्षण असत. आणि हे इतक नैसर्गिक असत की त्याबाबत काहीच इलाज  नसतो. ही मानसिक विकृती नाही वा कोणताच आजार नाही. पण या लोकांना इतकी वाईट वागणुक दिली जाते. जर्मनीत नाझींनी तर या वागणूकीत सैतानाला लाज वाटेल अशी कृत्य केलेली आहेत. आपल्या समाजात या लोकांची खुप टिंगल टवाळी केली जाते. त्यांना जगण मुश्किल केल जात. यात काही निरपराध आत्महत्या करतात. तर काही हे अपमानीत जिवन स्विकारुन मृत्युची वाट पाहात बसतात.

आज समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे. आपल यावर काय मत आहे ?

Saturday, January 14, 2012

मित्रांशी हितगुज



माझ्या तरुण मित्रांनो,

तरुण शरीरानी, मनानी, विचारांनी ......मित्रांनो मी कुठेही वयानी म्हणालो नाही.

आपण किती दिवस लहान राहायच ? किती दिवस आईच्या पदराखाली राहायच ? चला आज आपण जरा वेगळा विचार करु या. मी माझे विचार मांडतोय. मला तुमचे त्यावर मत ऎकायला नक्कीच आवडेल.

माझे दोन मित्र आहेत. माझ्यापेक्षा थोडे मोठे. एक आहे ललित भाटिया व दूसरा आहे अमित देशमुख.
ललित तसा डोक्यानी बरा, खुप हुशार नाही. पण टाकाउसुद्धा नाही. ५ वी पासून त्याच्या सुज्ञ वडलांनी त्याला त्यांच्या एका मित्राच्या दुकानात अर्धवेळ नोकरीला लावल. ८ वीत असतानाच त्यानी घरीच स्टेशनरीचा धंदा चालू केला. कुठून तरी वह्या, पुस्तक, बाकी स्टेशनरी आणायचा व विकायचा. बोलण खुप चांगल. शाळा कॉलेजमधे जाउन तो स्टेशनरी विकायचा, ऑफ़िसेसमधे विकायचा. बघता बघता त्यानी एक लहानसा गाळा भाड्यानी घेतला, पुढे तोच गाळा विकत घेतला. हे सर्व करत असताना तो शिकत असायचा. मी कधीतरी त्याच्या दुकानात जायचो. हा ललित एकाच वेळी लोकांकडून पैसे घ्यायचा, हिशोब करायचा, सुट्टे बिनचूक द्यायचा, गिर्‍हाईकांशी बोलायचा, माल घेउन आलेल्या विक्रेत्याकडुन हिशोब करुन माल घ्यायचा व हजारो रुपये एकदा अथवा दोनदा मोजुन द्यायचा. मी मात्र माझ्या जवळ असलेल्या १०-१० च्या ८ नोटा, परत परत मोजुन त्याला द्यायचो. ललितच्या चेहर्‍यावर नेहेमी उत्साह असायचा, एक आत्मविश्वास असायचा. त्याला एकदा विचारल की ललित तू पैसे कसे इंव्हेस्ट करतोस? त्यानी मला सर्व प्लान सांगीतला. त्याच्याकडे पैसे साठवायचा, ते वाढवायचा, धंद्यात परत गुंतवायचा व धंदा वाढवायचा सर्व प्लॅन तयार होते.

अमितदादा हा प्रचंड हुशार होता. त्याचा कधी कधी मला खुप राग यायचा. कितीही कठिण गणित द्या दादा ते तोंडीच सोडवायचा, कोणतही कोड सांगा लगेच उत्तर तयार. त्याला या बाबतीत हारवायच कधी सुख मिळालच नाही. दादा BE ला युनिव्हर्सिटित पहिला आला. त्याला पहिलाच पगार ६५०००/- रु. मिळाला. वडलांना रिटायर होताना ६०००/- रु. पगार होता. दादा व घरचे सर्व खुश झाले. मोठी पार्टी दिली. मी मदतनीस होतोच. सर्वात शेवटी कॉंट्रॅक्टरला द्यायचे पैसे तयार ठेवायचे होते. दादानी मला मदतीला घेतल. द्यायचे पैसे मी, त्यानी त्याच्या आई, बाबांनी परत परत मोजले. कमीत कमी ते १२०००/- रुपये आम्ही १० वेळा मोजले असतील. पैसे दिल्यावर त्याच्या आईनी दादाला विचारल "अमित तुझी खात्री आहे न की तू पैसे बरोबर दिलेस ?" दादाचा चेहराच उतरला. मी दादाला विचारल "दादा तुला इतका जास्त पगार आहे. तू या पैशाच काय करायच ठरवल आहेस? त्याचा विनियोग कसा करणार?" आता माझा दादा एकदम बावळट वाटायला लागला. चेहर्‍यावरची हुशारी, डोळ्यातली चमक, बोलण्यातला हजर जबाबीपणा सर्व पार निघुन गेल. दादा केविलवाणॆपणे म्हणाला "नाही रे मी यावर विचारच केला नाही"

माझ हे म्हणण नाही की शिक्षण उपयोगी नाही पण व्यवहार ज्ञान नसणं.....
दादाला पुढेमागे हे व्यवहार ज्ञान येईलच पण तो पर्यंत ललित त्या ज्ञानात किती तरी पुढे निघुन गेलेला असेल.

माझ्या मित्रांनो, जरा विचार करा, आपण कुठे मागे पडतोय ? आपण त्याच त्या एकाच पाय वाटेनी चालत राहाणार का ? शाळेत जायच, खाली मान घालुन अभ्यास करायचा, १० वी-१२ वी व्हायच आणि पुढील शिक्षणाच्या व आयुष्याच्या एका अंधार्‍या जगात शिरायच.

आपण नोकरी करा, अथवा व्यवसाय करा सारासार विवेक बुद्धी (commonsense ) फ़ार आवश्यक आहे. आणि ही चाकोरी बद्ध जिवनातून तयार होणं शक्यच नाही.

आजच्या गतिमान जगात तुम्ही तुमच्या जिवनाचा मार्ग जितक्या लवकर निवडाल व जितक्या लवकर त्यात स्थिर-स्थावर व्हाल तेव्हढ तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल.

संधीचे घोडे खुप जोरात पळतात, त्यावर आरुढ व्हायच का त्या घोड्याच्या लाथा खात जगायच हेच फ़क्त ठरवायच आहे.

यासाठी काय कारायच ? तेच आपल्याला डिस्कस करायच आहे.

१. वेळेचा योग्य उपयोग करा
सर्वात पहिल, आपला सर्वात जास्त वेळ खाणारा मोबाईल फ़ेकुन द्या. हायजिनीकली तर तो वाईट आहेच, ते मी तुम्हाला वेगळ सांगायला नकोच. पण ह्या मोबईल कंपन्या आपल्याला त्याचं एक व्यसन लावतायत हे लक्षात घ्या. एका व्यक्तीला किती SMS करावे लागतात ? मला काही मित्र माहिती आहेत जे दिवस भर मोबाईल घेउनच बसलेले असतात.

कॉंप्युटरवर नुसते गेम खेळु नका. त्यावर रोज निदान एक तरी प्रोग्राम करा. एका तरी विषयाची नवी माहिती मिळावा. याला फ़ार तर फ़ार ३० मी. लागतील.

आपल्या दिवसच्या वेळेच टाईम टेबल करा. त्यात रिकामा वेळ असु द्या. तुमच्या बिझी वेळचं व रिकाम्या वेळचं योग्य प्रमाण असु द्या. खेळ आवश्यक आहेच.

वेळेचा विनियोग यावर आपण वेगळी चर्चा करु या.

२. जास्तीत जास्त माहिती मिळावा.

मला एक सांगा, आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणींचे आई-वडिल काय करतात ? कोणत्या क्षेत्रात आहेत ? याची माहिती आहे का? आपण कधी त्यांच्याशी त्या विषयावर चर्चा केली आहे का ? नसेल तर करा. आपल्याला नक्कीच ५-१० निरनिराळ्या क्षेत्रांची माहिती मिळेल. त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपण त्या संबंधात जास्त महिती इंटरनेटवर मिळवा.

मी एकदा कलकत्याला जात होतो. बाजुला एक आजोबा बसलेले होते. आजोबा खुप कमी बोलत होते. मी त्यांना विचारल तेव्हा समजल की ते एक्झिम बॅंकेमधे मोठ्या हुद्यावर होते. मी त्यांना विचारल "एक्झिम बॅंक नक्की काय करते, आयात निर्यात क्षेत्रावर ती कसा कंट्रोल ठेवते, व निर्यात करण्यासाठी कस उद्युक्त करते?" आजोबांना हा प्रश्न माझ्याकडुन नक्किच आपेक्षीत नव्हता. आधी नुसतच त्यांनी हासुन सोडुन दिल. पण नंतर त्यांनी मला बरीच माहिती दिली. काही मला समजली काही नाही. पण जी समजली ती सुद्धा बरीच होती. माझी खात्री आहे ही माहिती नक्किच फ़ुकट जाणार नाही.

३. सुट्टीत थोडे तरी पैसे मिळ्वायचा प्रयत्न करा.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर, जे आपण शिकलो त्याच्या जोरावर काही तरी कमवा.
अ ) आपल्या भाषा चांगल्या असतील तर भाषांतराच काम करा, वेब साईट कंटेंट राईटींगच काम करा.
ब ) गणित सायन्स चांगल असेल तर क्लासेसला नोटस्‌ काढुन द्या. आज कितीही मोठा व कितीही नावाजलेला क्लास असला तरी त्यांना नोट्स्‌ काढणं व त्या अप्‌टुडेट ठेवण खुप कठीण जात. त्यांना अशा प्रकारच काम करणारी मंडळी हवीच असतात. यात बरा पैसा मिळतो.
क ) आपल्याकडे शिक्षण कमी असेल तर, ऑफ़िसेस , बॅंका व शाळांच्या स्टाफ़ला घरगुती पदार्थ खायला घेउन जा. यात खुप पैसा आहे.
ड ) आपल्याकडे गावाला जागा असेल तर वर लिहिलेल्या लोकांसाठी सहल आयोजित करा.
ई ) निरनिराळ्या पर्यटन क्षेत्रांची नीट माहिती मिळावा व पर्यटान गाईड (या साठी इंग्रजी नीट असाव)च काम करा.
फ़ ) आपल्या जवळपास असलेल्या वृद्ध पण सधन लोकांना औषध आणुन देण, सामान आणुन देण, विज बिल, फ़ोनच बिल भरण या सारखी काम करा. यात पैसा भरपूर आहे.

आपल्याला पैशाची गरज असो वा नसो या पैसे कमावण्यानी आपलं व्यवहार ज्ञान नक्किच वाढेल, एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल.

या सुट्टीत करुन बघा, पुढिल वर्षाच्या शिक्षणाची सोय करा, निदान आपल्या पॉकेटमनीची सोय करा.
आपल्याला जर पैशाची गरज असेल व वर्षभर शिकताना काही उद्योग हवा असेल तर हाच उद्योग तसाच पुढे चालु ठेवु शकता.

कदाचित याचाच उपयोग आपल्याला शिक्षणानंतर लवकर स्थिरस्थावर व्हायला होईल.

४. एका तरी व्यवसायाचा सखोल अभ्यास करयचा प्रयत्न करा.

आपल्या जवळच्या दुकानाचा व्यवहार, एखाद्या कारखान्याचा व्यवहार याचा अभ्यास करायचा प्रयत्न करा. आपल निरिक्षण व समज याच्या जोरावर त्या व्यवहारात असलेल्या त्रुटी शोधा, योग्य माणासापाशी व योग्य पद्दतीनी तुमच निरिक्षण व तुमचा त्यावर असलेला उपाय सुचवा. कदाचित तुमचा उपाय त्यांनी आधीच करुन पाहिला असेल, चर्चा होईल तुमच ज्ञान नक्किच वाढेल.

वेगळा विचार करायची सवय लागेल. जी तुमच्या पुढच्या आयुष्यात नक्किच उपयोगी ठरेल.

५. थोड तरी सोशल वर्क करा

आपल्या जवळपास असलेल्या एखाद्या समाजोपयोगी संस्थेबरोबर या सुट्टीत काही तरी काम करा. वृद्धाश्रमात जा, हॉस्पिटलमधे जा. बघा तुमचा आउट्लुक सगळा बदलुन जाईल.

जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी बोलता तेव्हा तुमचा common sense नक्कीच वाढत असतो. निरनिराळ्या वयोगटातल्या लोकांशी, कमी जास्त समज असलेल्या लोकांशी, कस वागायच हे समजत जात.
व्यवहार व सोशल वर्क याची कधीच गल्लत करु नका. सोशलवर्कमधुन कधीच पैशांची आपेक्षा करु नका व व्यवहारात कधीच सोशलवर्क करु नका.

६. आपल्या पुढील आयुष्याची थोडी तरी रुपरेषा तयार करा.

आपल्याला पुढच्या आयुष्यात कोण व्हायचय ? आपलं आवडत क्षेत्र कोणत आहे ? त्या क्षेत्रात तज्ञ होण्यासाठी किती मेहनत व पैसे लागतात? पुढे त्या क्षेत्रात कसे प्रॉस्पेक्टस्‌ आहेत ? या सर्वाची एक ढोबळ रुपरेषा आपल्याजवळ तयार असणे गरजेचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या कमीत कमी एका तज्ञ व्यक्तीशी आपली चर्चा झालेली असली पाहिजे. नक्कि कोण तज्ञ आहे व कोण फ़क्त हवेत बोलतय हे तर समजण फ़ार फ़ार आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला थोड तरी आपल क्षेत्र माहिती असण , लोकांशी बोलायची व अ‍ॅनलिसिस करायची सवय असण गरजेच आहे. हे सवयीनीच होत.

परदेशातली मुल फ़र लवकर आपल्या पायावर उभी असतात व त्यामुळे खर्‍या अर्थी आपण त्यांच्याशी कधीच स्पर्धा करु शकत नाही. भारतिय लोकांना परदेशात नोकर्‍या मिळातात त्या फ़ार लोलेव्हलच्या असतात व ज्या असतात त्या कमी पैसे देत असतात. आता ब्राझिल सारख्या अती गरिब देशातुन अमेरिकेत नोकर्‍या करण्यासाठी जेव्हा लोक यायला सुरुवात झाली, तेव्हा आपल्या लोकांच्या नोकर्‍यांवर हळु हळू गदा येत चालली आहे.

महाराष्ट्रात असलेले उद्योग भराभर परदेशी लोकांच्या हातात जातायत. जर आपण वेळॆवर जागे झालो नाही तर मग आपली स्थिती कठीण आहे.

जग हे एक सिव्हिलाइज्ड जंगल आहे. त्यातला जंगल कायदा समजुन घ्या. इथे कोणी कोणावर दया दाखवणार नसतो. त्यात कस जगायच हे जाणुन घ्या.
 
निरंजन

Thursday, January 5, 2012

It just blows my mind.


I ponder over the vast and awesome universe. Indeed, it just blows my mind. While there are as many as 100 billion stars in our Milky Way Galaxy, more than 350 billion galaxies extend beyond the realms of our vision.
Recently the United States’ WISE rocket was propelled out farther, exploring the expanse of space that we only marvel today. Guess what, the quest seems as if just begun, to reveal hidden galaxies unexplored! The depth of the universe seems boundless, regardless of the extent, to which I stretch my mind.
What amazes me more is that there is a God, awesome and powerful that he spoke it all into existence.
Astonishing as it may sound, is God who made it all, decided to become one of us and be born as a baby among us. Our mind just isn’t capable to conceive it all, but he did in spite of our ability to understand it all.
Why? Why the creator of it all would be born as a baby like one of us. Unable to dig reasons behind it, I believe I have stumbled across a few. In all probabilities, to know first of all, what God really is like? He is no longer just a cosmic force, somewhere out there in time and space. He became one of us so we can know him personally.
He also left glory to walk over our earth so as to provide us a way, to be forgiven of our sins and spend an eternity with him. Leaving me baffled, I am still amazed at the wonder of it all!
Would you like to know how that makes me feel? It makes me want to live the rest of my life with a passion to please the one who created it all. It makes me more determined than ever to trust him and serve him out of absolute gratitude for what he has done for me.
It just blows my mind.

Monday, January 2, 2012

बालवाडी

तुम्ही ज्यावेळी पहिले पाऊल ठेवता शाळेमध्ये त्यावेळी तुम्हाला काय वाटले ते कधीच कुणाला आठवत नाही बहुतेक... खूप लहान असतो आपण आणि घाबरलेले पण...इतकी सगळी आपल्या वयाची मुले- मुली, आईला सोडून कुठल्या तरी अनोळखी माणसाचे आपण सगळे ऐकायचे आणि त्याही पेक्षा आपल्या वयाची इतकी मुले आहेत म्हणजे नेहमी आपल्याला हवे तसे होणार नाही याची जाणीव...! पण हळूहळू जसे तुम्ही शाळेला जाऊ लागता तसे कळायला लागते कि आपले आयुष्य हे कदाचित हळूहळू आपल्या हातात यायला लागेल.. शाळेत बाईंचे आणि घरात आई बाबांचे सारखे ऐकावे लागणार नाही.. कधीतरी माझे पण ते ऐकतील आणि त्यासाठी शाळेत गेले पाहिजे.. काही वर्षे जातात मग लक्षात येते कि नुसते शाळेत जाऊन शहाणे होऊन चालत नाही तर तो शहाणपणा विकावा लागतो आणि ज्याच्या शहाणपणाची किंमत जास्त त्याच्या शब्दांना किंमत पण जास्त... ! आणि मग लक्षात येते कि शाळेत असतात वाटेल होते कि शाळा संपली कि आपण खूप शहाणे, सगळ्याची उत्तरे असलेले माणूस होऊ जसे आई बाबा आहेत.. पण कॉलेज लवकरच शिकवते कि हे सगळे मृगजळ आहे.... आणि त्यातले आई बाबा शाळेत असतानाचे जे आपल्याला माहित होते ते फक्त चांगले खुश दिसणारे आई बाबा होते.. पण त्यांनाहि पण खूप सारे प्रोब्लेम्स होते.. जे त्यांनी कधी आपल्याला सांगितले नाहीत... त्यांना पण त्यांच्या आई बाबांची आठवण यायची पण त्यांनी कधी सांगितले नाही...त्यांना पण आपल्यासारखे घाबरायला व्हायचे, त्यांना पण सगळे निर्णय घेता येत नाहीत... त्यांचे आयुष्य पण पूर्णपणे त्यांच्या मनाप्रमाणे चालत नाही.... आणि मग लक्षात यायला लागते कि शाळेत असताना आपण समजलेले आयुष्य होते ते सगळे क्षणभंगुर होते... जसे जसे तुम्ही मोठे होता तसे बर्याच गोष्टी बदलत जातात... आणि त्याहूनही तुम्ही बदलता... तुमच्या समाधानच्या आनंदाच्या व्याख्या बदलतात... कॉलेज पूर्ण करून मोठे व्हायची स्वप्न पाहिलेले आपले मन एकदम खट्टू होते ज्यावेळी त्याला कळते कि कॉलेज पूर्ण झाले आहे म्हणजे फक्त सुरुवात आहे ... एका नव्या आयुष्याची... जिथे फारसे काही आपल्या हातात नाही आहे अन म्हटले तर सगळे काही आपल्या हातात आहे...! मग कधी कधी बाहेर मस्त पाऊस पडत असताना आपण खिडकीत उभे राहून बाहेर रस्त्याकडे बघत असतो.. कुठेतरी आपल्याच लहानपणीचे दिवस आपण आठवत असतो... पावसात भिजताना ... आणि मग वाटते कि कधीतरी मृगजळासारखे दिसणारे हे आयुष्य जगणे कधी सोपे होणार आहे का? कधीतरी आयुष्याचा अर्थ कळणार आहे का आपल्याला... का आपण पण असेच पुढे सरकत जाणारे प्रवासी आहोत बाकीच्या असंख्य लोकांबरोबर.... ज्यांना उमगलेले नाही आहे कि त्यांना काय हवे आहे आयुष्यामध्ये... ! आणि मग वाटते कि तो शाळेचा पहिला दिवस परत एकदा आपण जगायला लागलो आहोत... अनोळखी लोक, वेगळाच रिंग मास्तर आणि सतत काहीतरी दाखवून द्यायची शर्यत.... ! बाराखडी, पाढे, वाचायला, लिहायला येणे या गोष्टींच्या व्याख्या बदलतात प्रत्येकवेळी फक्त... !

Saturday, December 10, 2011

राजकारण: एक आठवण

राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे.

मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला). प्रत्येक भींत रंगवली जायची. स्लोगन्स देत रिक्षा/टेम्पो दिवसरात्र फ़िरत. प्रत्य्के पक्षाचं चिन्ह माहित करुन घ्यायची उत्सुकताही असे.

विधानसभा, लोकसभा, नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका एखाद्या क्रिकेट मॅच सारख्या वाटत. निवडणुकांचा हंगामच होता तो.

व्हि.पी.सिंग पंतप्रधान झाले, देवीलाल उपपंतप्रधान. मग आरक्षणाबद्दल ऐकु लागलो. कि आरक्षणामुळे कशी काय देशाची वाट लागणार आहे. लायकी नसलेले लोकं कसे काय पुढे येतील असंच काही. मंडल कमीशनबद्दल लोकं बोलत. कोणी आत्मदहन केलं असं वाचायला मिळे. मी तेव्हा नुकताच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला होता. आमचे शिक्षक त्याकाळचे बहुतेक रा. स्व संघातले होते. शिकवायचे उत्कृष्ट, पण मधुन मधुन आरक्षण, राममंदीर वगैरेंवर बोलायचे. त्यातुनच समज झाला होता की आरक्षण वाईट आणि राममंदीर व्हायलाच पाहिजे वगैरे.

पुढे व्हि.पी.सिंग ह्यांचा पाठींबा भाजपाने काढला. सरकार गडगडले. जनता दलात फ़ुट पडली. चंद्रशेखर ह्यांना राजीव गांधींनी पाठींबा देऊन पंतप्रधान बनवलं. ही बाब तर तेव्हा खुपच नवलाईची वाटली होती..की शेवटी राजीव गांधींचाच पाठींबा घेतला. पण पुढे हळु हळु राममंदीराचीच चर्चा सुरु झाली. तो प्रचार इतका मजबुत होता की आम्हीही "हम कसम राम की खाते है...मंदीर वही बनायेंगे" आणि अशा अनेक घोषणा पाठ करायला लागलो.


त्याच काळात १९९० साली विधानसभेच्या निवडणुकाही झाल्यात. बाळासाहेब, भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी ह्यांची नावं ऐकीवात येत. शिवसेना आधीपासुनच माहीत होती त्यांच्या वाघ ह्या चिन्हामुळे. विधानसभेला धनुष्यबाणाचं चिन्ह पाहुन आश्चर्य वाटलं होतं.

अंबरनाथच्या शाळेत जातांना तिथल्या मतदारसंघातले उमेदवारही कळुन येत. शिवसेनेचे साबिर भाई शेख तेव्हा निवडणुकीला उभे होते आणि कॉंग्रेसतर्फ़े कोणीतरी संजय दत्त म्हणुन उमेदवार तिथे होता. आधी तो आम्हाला सिनेस्टार संजय दत्त वाटे.

उल्हासनगरला पप्पु कलानी नगराध्यक्ष झाल्यावर उल्हासनगरचा कायापालट सुरु झाला होता. आणि कलानी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. उल्हासनगरचं सिंगापुर करायचा त्यांचा इरादा आहे असं ऐकायचो तेव्हा. ९० साली ते आमदारकीला कॉंग्रेसतर्फ़े उभे राहिले तेव्हा त्यांची प्रचाराची फ़ेरी आजही आठवते. एका वेगळ्याच प्रकारच्या बससदृश मोठ्या गाडीच्या टपावर बसुन त्यांची वरात निघे.

अंबरनाथला सेना जिंकली तर उल्हासनगरला पप्पु कलानी. राज्यात थोडक्यात पवारांचे सरकार आले. तेव्हा पवारांच्या कौशल्याबद्दलही बरचं ऐकायला यायचं नक्की काय कौशल्य ते कळायचं नाही. कलानींबरोबरचे त्यांचे संबंधही ऐकायला मिळायचे. विरोधी पक्षनेता म्हणुन मनोहर जोशींची निवड झाली त्याबद्दलही चर्चा चालत की सुधीर जोशी हे जास्त योग्य होते आणि भुजबळांचा तर हक्कच होता.

त्याच काळी आम्ही अंबरनाथला रहायला आलो. आमच्या शाळा अंबरनाथला असल्याने आणि अंबरनाथ हे स्टार्टींग स्टेशन असल्याने बाबांनी अंबरनाथला घर घेतले. अंबरनाथला आल्यावर शिवसेना शाखा म्हणजे काय हे बघायला मिळाले. एका किल्ल्याची प्रतिकृती असलेली शाखा आणि त्यातले दाढीवाले शिवसैनिक ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. माझ्या मित्राचे मामा (पोतनीस काका) शिवसेनेत होते आणि आमच्याच गल्लीत रहायचे. तेव्हा त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. ते कसे कारसेवक म्हणुन अयोध्येला जाणार आहेत वगैरे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस आली तरी देशपातळीवर वेगळेच वारे होते. राममंदीर आंदोलन जोरात असतांना कॉंग्रेसने चंद्रशेखर ह्यांचा पाठींबा काढुन घेतला होता आणि पुन्हा निवडणुक होणार होती. प्रचार जोरदार सुरु होता. पण त्या प्रचारकाळातच राजीव गांधींचा खुन झाला आणि सगळं वातावरण बदललं. कॉंग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या आणि पवार पंतप्रधान होणार अशा वावड्या उठायला लागल्या. महाराष्ट्रात जवळपास ३८ खासदार कॉंग्रेसचे होते. पण त्यांनी पवारांना पाठींबा दिला नाही असं कळलं. सुनील दत्त ह्यांनी तर स्पष्टपणे नकार दिला होता हे त्यांच्या मुलाखतीत कळलं.

त्याआधी एक मोठी घटना घडली...ती म्हणजे शिवसेनेला भुजबळांनी दिलेली सोडचिठ्ठी. भुजबळ लपुन राहिले होते आणि शिवसैनिक त्यांना शोधत होते. अनेक शिवसैनिकांना अटक झाली होती, अनेक शिवसैनिक भुमिगत होते. माझ्या मित्राचे मामाही. भुजबळ म्हणजे सगळ्यात मोठा गद्दार असं वातावरण शिवसैनिकांमधे होतं आणि त्यांना धडा शिकवायची इर्षाही दिसुन येई.

पवार दिल्लीत गेल्यावर सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाच राममंदिर आंदोलनातुन बाबरीपतन झाले. ते शिवसैनिकांनी पाडले असं ऐकुन अजुनच चांगले वाटायचे. त्याच काळात मुंबईत दंगली झाल्या. पण अंबरनाथ शांत होते. साबिरभाई हे मुस्लिम असल्याने असावं कदाचित. दंगली पाठोपाठ बॉंम्बस्फ़ोट झाले. पुढे संजय दत्तला अटक झाली. सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि पवार महाराष्ट्रात परतले.

त्याच काळात पवारांवर आरोप सुरु झाले. मुंडे हे नाव मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. खैरनार, मुंडे बेफ़ाम होते. एन्रॉन प्रकल्प तेव्हा महाराष्ट्रात येणार होता. सुधाकर नाईकही पवारांचे विरोधक बनले होते. कॉंग्रेस मधे निष्ठावंत नावाचा गट असतो तेही त्याकाळात कळलं. पवारांवर आरोप होत होते आणि त्यांची छबी एकदम भ्रष्ट, माफ़ियांचा सरताज अशी बनली. एकुणच पवारविरोधी वातावरण होतं. १९९५ साली झालेली निवडणुक पवार हरले. अवघ्या ८० जागा कॉंग्रेसला मिळाल्या. भुजबळांचा पराभव इर्षेला पेटलेल्या शिवसैनिकांनी करुन दाखवला. बाळा नांदगावकर ह्या अपरिचित चेहऱ्याला निवडुन आणला.

पुढे युतीच्या शासनात आमच्या आसपासचे बरेच शिवसैनिक सफ़ारी घालुन फ़िरायला लागले. बिल्डर बनले कोणी कंत्राटदार...त्याचबरोबर त्यांचा उत्साहही कमी होतांना दिसत होता. ह्याच काळात आम्ही मित्रमंडळीनी शाखेत जायला सुरुवात केली. शिवसेनेच्या...संघाच्या नाही. संघशाखांमधे संध्याकाळी क्रिकेटच्या टाईमाला पकडुन घेऊन जातात आणि कसलेतरी फ़ालतु खेळ खेळवतात म्हणुन आम्ही आधीपासुनच त्यापासुन लांब होतो. मी तेव्हा इंजिनिअरींगला होतो. फ़ारसा वेळ नसे. पण तरी वीकएंड्सला क्रिकेट खेळायचो. आमची टीम फ़ॉर्मात होती.

त्याकाळी अंबरनाथला लोकल गुन्हेगारीमुळे क्रिकेट टुर्नामेंट भरविणे बंद झाले होते. वादावादीतुन कोणी तलवारी बाहेर काढी. आणि मग सगळाच गोंधळ. पण टुर्नामेंट भरवण्यात फ़ायदा खुप होता. घरुन तेव्हा पैसे मिळत नसत. आम्ही ठरवले की टुर्नामेंट भरवायचीच.

पण टुर्नामेंटमधे जर कोणी गोंधळ घातला तर काय? म्हणुन आम्ही पोलिसांकडे प्रोटेक्शन मागायला गेलो. इतक्या शिव्या पोलिसांनी घातल्या असतील तेव्हा...शिव्या देऊन पळवुन लावले त्यांनी...तुम्ही काय इंटरनॅशनल टुर्नामेंट भरवताय काय...की सेक्युरिटी पाहिजे असं म्हणुन हाकललं पोलिसांनी. मग आम्ही शिवसेनेचा सहारा घेतला. सगळे जण रोज शिवसेना शाखेत हजेरी लावायचो. माझ्या मित्राच्या मामांना आम्ही कन्व्हिन्स केलं की टुर्नामेंट भरवणं कसं गरजेचं आहे. मग त्यांनी सगळ्यांना तयार केले, स्पॉन्सर्सचा बंदोबस्त केला आणि त्यातुन आम्ही नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यातुन आम्हाला क्रिकेट्च्या २ बॅट आणि स्टंम्पस मिळाले. आम्ही खुष होतो. पुढेपुढे शाखेला जाणे कमी झाले. तिथे गेल्यावर कळले स्थानिक राजकारण काय असते ते.

स्थानिक राजकारणात तुम्ही कुठल्याही पक्षात जा. तिथे जर तुमची मोठी गँग असेल तर तुम्हाला वाव मिळणार. त्यामुळे तिथे प्रत्येकजण आपली जास्तीत जास्त पोरं घुसवायच्या नादात असतो. त्यातुनच पदांची वाटणी वगैरे होते. पुढे राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर माझा एक मित्र मला तिथे घेऊन गेला. त्याला युवक अध्यक्ष करणार होते...तो मला म्हणाला की आपली २०-२५ मंडळी घेउन चल. तुला उपाध्यक्ष करतो. पहिल्या २ मिटींगनंतर मी तिथे फ़िरकलो नाही. अर्धी लोकं बेवडा मारुन आली होती. ही लोकं कोणाचं काम करतील असं वाटलं नाही.

त्यानंतर राजकारण सुटलंच. जे वाचायचं ते पेपर मधे. बाळासाहेब आणि पवार ह्या दोघांनाही पुढे फ़ारसं यश मिळालं नाही ह्याची खंत मात्र उगाच वाटत राहते.

Tuesday, December 6, 2011

माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट......


प्रत्येक लहान मुलाला आपल्या वडलांबाबत प्रचंड अभिमान असतो. घरात त्याला आपल्या वडलांचा अधार वाटतो पण काही अभागी मुलांना वडील असुन त्या वडलांबद्दल अभिमान वाटावा अस ऎकायला मिळत नाही. अनेक कारण असतात त्यासाठी. कधी कधी वडिल खरच कोणतच चांगल काम करत नाहीत. कधीकधी घरातल वातावरण तस असत. आई वडलांची भांडण असतात व त्यामुळे आई सतत वडलांबद्दल वाईटच बोलत असते.

नुकताच मला एक अनुभव आला.

माझ्याबरोबर पूर्वी काम करणारा एक माणूस मला रस्त्यात भेटला. अतिशय हुशार असा हा माणूस, माझ्या आधीच्या कंपनीत प्युन म्हणून लागला होता. बघता बघता संगणकाच रिपेअरिंग, थोडफ़ार सॉफ़्टवेअर हा थोड्या अवधीत शिकला होता. अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माणसात सर्व गुण ठासुन भरलेले होते. फ़क्त एकच दुर्गुण या गृहस्थात होता ज्यामुळे त्याचे सर्व गुण फ़ुकट गेले होते तो म्हणजे हा दारुडा होता.

अनेकवेळा मी त्याला खुप झिंगुन लडबडत चालताना पाहिलेल आहे. आज तो शुद्धीवर दिसला, म्हणुन त्याची चौकशी करावी अस वाटल. मला त्यानी रस्त्यातच नमस्कार केला.

आपल्या ३-४ वर्षाच्या लहान मुलाला घेऊन तो चाललेला होता. बाप व मुलगा दोघेही अनवाणी व विटक्या कपड्यात होते. बापाचा चेहरा दारुमुळे सुजलेला होता. मुलाला बहुतेक २-४ दिवस आंघोळ घातलेली नसावी. कपडे फ़ाटके व मळलेले होते. केस कोरडे व रखरखीत दिसत होते. मी मुलाकडे बघितल, लक्षात येत होते ते त्याचे चकाकणारे काळॆभोर, पाणीदार व मोठे डोळॆ. ते डोळे भराभर आजुबाजुचा परिसर न्यहाळात होते व मिळेल ते शिकत होते. त्याच्या बापासारखाच हाही खुप हुशार असावा. चेहरा खुप तरतरीत व बोलका होता. मी माझ्या नकळत खाली वाकलो आणि त्याला उचलुन घेतल. आणि त्याचा बाप नको नको म्हणत असता जवळाच्या दुकानातुन एक बिस्किटाचा पुडा घेऊन त्या मुलाला दिला.

त्या मुलाला म्हणालो "तुझा बाप माझा खुप चांगला मित्र आहे, खुप हुशार व प्रामणिक आहे तो. त्याच्यासारखाच हो बर का ! " तो मुलगा इतका गोड हासला. आणि त्यानी अभिमानानी आपल्या बापाकडे पाहिल. काही न बोलता मित्र मुलाला माझ्या कडेवरुन घेऊन निघुन गेला. मला वाट्ल मी बोलताना काही चुक केली की काय.

काही दिवस मधे गेले आणि तो मित्र माझ्या घरी आला. आज त्याचा चेहरा कमी सुजलेला वाटला. मला म्हणाला "काका, त्या दिवशी तुम्ही मला रस्त्यात भेटलात व मुलाला म्हणालात की ’तुझा बाप खुप हुशार व प्रामाणिक आहे’ हे ऎकल्यावर मुलानी माझ्याकडे इतक्या अभिमानानी बघितल की मला ती नजर सहनच झाली नाही. घरी जाऊन त्यानी सर्वांना सांगितल की आजोबा म्हणत होते की बाबा खुप हुषार आहे. त्यानी पहिल्यांदाच आपल्या दारुड्या बापाबद्दल चांगल ऎकलेल असेल. त्याला मी कधी बिस्किट घेऊन दिलेल नव्हत. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच संपूर्ण बिस्किटाचा पुडा मिळाला. पण काका त्यानंतर दारु पिताना मला तीच नजर दिसते. पोटात ढवळुन येत आणि मी दारु न पीता सरळ घरी जातो. काल त्याला बिस्किटाचा पुडा घेऊन गेलो. त्यानी विचारल की ’आजोबांनी दिला का ?’ मी म्हणालो "नाही रे मीच तुझ्यासाठी आणला आहे, माझ्या बाळासाठी" मित्र म्हणाला "काका, मी हे बोलल्यावर त्यानी खुप आनंदानी माझ्या गळ्यात मिठी मारली. बस मी ठरवल आहे. आता दारु नाही प्यायची."

या माझ्या मित्राचा हा निश्चय किती दिवस टिकेल कल्पना नाही. पण त्या लहान मुलाला "माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट" अस नक्कीच वाटल असेल.

आपण किती नशिबवान असतो आपल्याला जगातले सर्वात चांगले आई-बाबा मिळालेले असतात. फ़क्त ते किती चांगले होते हे ते गेल्यानंतरच आपल्याला समजत. मला माझ्या वडलांच्या आठवणी एकामागोमाग एक येत गेल्या.

मला माझ बालपण आठवायला लागल. माझ्या त्यावेळच्या जगात असलेल्या प्रत्येक संकटांमधुन मला बाहेर काढायची शक्ति असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडिल. मी त्यांना आण्णा म्हणायचो. त्यांच्या रुंद छातीचा मला खुप अभिमान होता. या छातीवर त्यांनी आभाळ पेललेल होत.

कधी ताप आला, काही लागल व नुसता त्यांच्या हाताचा स्पर्ष झाला तरी दुखण कमी व्हायच. ती एक त्यांच्या प्रेमाची जादू होती.

लहान असताना मला आजी शबरीची गोष्ट सांगत होत्या. खुप रंगवुन रंगवुन त्यांनी ती कथा सांगितली. शबरीनी बोरं कशी आणली व प्रत्येक बोर चाखुन कस पाहिल. आणि रामानी तीची भक्ति पाहुन ती बोरं कशी खाल्ली

आजी सांगत होती

"शबरीनी रामासाठी रानातुन बोरं आणली व ती गोड आहेत का हे बघायसाठी प्रत्येक बोर ती चाखत होती"
"पण आजी तीनी बोरं का आणली ? आंबा किंवा सफ़रचंद का नाही आणला ? देव तीच्या घरी येणार तर चांगल करायच न. आपण नाही का पूजा असली की किती चांगल करतो"

"अरे शबरी गरिब होती"

"गरिब म्हणजे काय ? "

"ज्यांच्याकडे कमी पैसे असतात त्यांना गरिब म्हणतात. ते लोक बाजारातुन फ़ळ आणू नाही शकत "

" आपण गरिब आहोत का ? "

" आपणही गरिबच. पण ती खुप गरिब होती "

" पण आजी आपण नाही का आंबे, द्राक्ष व सफ़रचंद आणतो. ते गोडच असतात. आणि रामानी ती उष्टी बोर कशासाठी खायची ? मला नाही ते आवडल. किती घाण होता तो."

माझ्या त्यावेळच्या जगात गरिबी व श्रिमंती या शब्दांना स्थानच नव्हत. आपण खुप आंबे, सफ़रचंद व द्राक्ष खातो. शबरी थो्डी कमी गरिब असेल पण तरी थोडी फ़ार अशी फ़ळ आणत असेलच न. मला काही केल्या आजीनी सांगितलेली गोष्ट पटतच नव्हती. आजीच लॉजीकच समजत नव्हत. उगाच आजीशी हुज्जत घालत होतो.

आण्णा ऎकत होते. रविवार सकाळाचा दिवस होता. ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. रान जवळच होत. त्यात मला नेल. एका आदिवासी माणसाच घर दाखवल. गरिबी काय असते हे मी पहिल्यांदाच पाहिल होत तेव्हा. मग त्याच आदिवास्याच्या मुलाबरोबर मला बोरं आणायला पाठवल. त्यावेळी पायात कोणाच्याच चपला नसायच्या. माझ्याही नव्हत्या. २-३ बोरं आणेपर्यंत पायात काटे रुतले. परत आलो. वडलांनी मला जवळ घेतल म्हणाले की

"शबरी किती गरिब असेल समजल का ?" मी होकारार्थी मान हलवली.

मग त्यांनी त्या वातावरणात शबरीची गोष्ट परत सांगितली म्हणाले

"त्या शबरीनी राम येणार म्हणून खुप बोर आणली. तीला किती बर काटे रुतले असतील ? जर रामानी बोरं उष्टी आहेत म्हणुन खाल्ली नसती तर त्या शबरीला किती बरं वाईट वाटल असत." मला एकदम ही गोष्ट पटली. रामाबद्दल आदर वाढला.

वडिल खुप मेहनत करत. मुंबईला नोकरीला जायचे. ठाणा स्टेशनवरुन आमच घर ५-६ मैल लांब होत. तेव्हढ अंतर चालत जाऊन ऑफ़िसमधे मेहनतीच काम करण साध नव्हत. शिवाय घरी आले की शेतीच काम, गुरांच काम होतच. खुप पसारा त्यांनी वाढवला होता. कमी शिकले असले तरी जे शिकले ते ब्रिटिशांच्या वेळच्या इंग्रजी शाळेत शिकले होते. इंग्रजीवर प्रभुत्व होत. ते एक चालती बोलती डिक्शनरी होते.

मुलांना जास्तीत जास्त शिकवायच व हे शिकवत असताना त्यांच्यासाठी काही तरी स्थावर मिळकत उभी करायचीच या ध्येयानी ते पछाडलेले होते. स्वतः १६ व्या वर्षी गिरणीत नोकरीला लागले, ते एक हेल्पर म्हणून आणि काम शिकत शिकत ते कॉस्ट अकाऊंटंट झाले. त्यांनी अनेक हालअपेष्टा काढल्या होत्या, पण त्याची साधी झळसुद्धा आमच्या पर्यंत येऊ दिली नाही. हे करताना नेहेमी ते आनंदी असायचे. मी तुमच्यासाठी किती करतोय, त्याची जाणिव ठेवा वगैरे कधीच लेक्चर दिल नाही. आईची त्यांना साथ होतीच पण मुख्य जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती.

बहिणी मोठ्या होत्या, आम्ही मुलं लहान होतो. मुलींची लग्न, बाळंतपणं, आला गेला या सर्वांच त्यांनी केल. आणि त्यातच आमची शिक्षणं केली. प्रॉप्रर्टीच्या केसेस पूर्ण केल्या. आमच्यावर कोणतीच जबाबदारी ठेवली नाही. मोठी घरं मात्र ठेवली.

मला नोकरी लागली. पहिला पगार १ तारखेला यायचा होता. त्यावेळच्या मानानी पगार बरा होता. ३० तारखेला त्यांनी नेहेमीसारख बजेट केल व मला म्हणाले

"आयुष्यात पहिल्यांदा बजेट केल आणि पैसे शिल्लक राहिलेत"

हे बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर इतक समाधान होतं.

मी विचारल की "येताना तुमच्यासाठी काय आणू ?"

ते म्हणाले "मला मिठाई व नानकटाई खावीशी वाटते. मी कधीच मजा म्हणून या गोष्टी खाल्या नाहीत"

आमच्यासाठी त्यांनी स्वतःचे किती हाल करुन घेतले असतील हे प्रथमच मला जाणवल. १६ व्या वर्षापासून नोकरीकरुन स्वतःच्या आई, बहिण व भावाला सांभाळताना. व नंतर संसाराचा गाडा ओढताना त्यांनी कितीतरी कॉंप्रमाईज केलेली असतील. या उतार वयात या कर्तबगार माणसाला या साध्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या.

मी पगार मिळताच येताना सर्वात पहिल्या या दोन गोष्टी विकत घेतल्या आणि घरी आलो. आण्णा झोपलेले होते. त्यांना खुप ताप होता.

मला म्हणाले की "मी ताप उतरला की मी मिठाई व नानकटाई खाणार आहे."

दोन दिवस ताप होता व तिसर्‍या दिवशी त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला. अ‍ॅंब्युलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटलमधे नेल. त्यांच्या चपला न्यायच्या राहुन गेल्या.

ते म्हणाले "निरंजन माझ्या चपला इथे आण रे"

मी घरी आलो आणि त्यांच्या चपला उचलल्या. पार झिजुन त्याच्या टाचांना भोकं पडली होती. आमच्यासाठी त्यांनी न बोलता किती खस्ता खाल्या होत्या, किती मेहनत केली होती, हे त्या चपलाच मला सांगत होत्या.
मी नोकरीच्या इंटर्व्हुला जाणार म्हणून माझ्यासाठी त्यांनी जबरदस्तिनी आणायला लावलेले नवे कोरे बुट माझ्या आधीच्या चांगल्या स्थितीतल्या बुटांच्या बाजुलाच होते आणि माझ्या पायात नवी चप्पल होती.
आजवर मला हे मिळाल नाही, ते मिळाल नाही, म्हणून खट्टू होणार्‍या मलाच मी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली.

आण्णांचा तोच एकमेव चपलांचा झिजलेला जोड माझ्या हातात होता. मी तसाच तो डोक्याला लावला मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या त्या त्यागापुढे नतमस्तक झालो होतो. माझ्या नकळत माझे डोळे भरुन आले आणि अश्रु त्या पवित्र चपलांवर पडले.